Ajit Pawar । …तर पुण्यात निर्बंध वाढवण्याची वेळ येईल; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात जरी कोरोनाचा प्रादुर्भाव (Outbreak of corona) कमी झाला असला तरी काही जिल्ह्यात याचा प्रभाव दिसून येत आहे. शनिवारी, रविवारी प्रचंड गर्दी होताना दिसते. महाबळेश्वर, खंडाळा-लोणावळा अशा ठिकणी पर्यटकांची गर्दी होत आहे. देवदर्शनाच्या निमित्ताने बाहेर जातात ते ठीक आहे. मात्र, ट्रेकिंगला, पर्यटनालाही लोक जात आहेत. पुण्यातील (pune) नागरिक जर बाहेर गेले तर त्यांना 15 दिवस विलगीकरण बंधनकारक करावं लागेल. असं उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar ) यांनी म्हटलं आहे. त्यावेळी पवार हे आज पुण्यात आढावा बैठकीत बोलत होते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यात कोरोना कमी होत असला तरी सिंधुदुर्ग (Sindhudurg), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), कोल्हापूर (Kolhapur) या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात रुग्ण आहेत.
दरम्यान, फोर्सच्या डॉक्टरांनी सांगितलं. अमेरिका, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रीका याठिकाणी तिसरी लाट येऊ पाहत आहे.
त्याठिकाणी लसीकरण होऊनही तशी परिस्थिती झाली आहे.
परंतु, प्रत्येक माणसाचं आरोग्य नीट असेल तर ठीक आहे.
अन्यथा कर्त्या व्यक्तीला जीव गमावला तर कुटुंब उघड्यावर पडतं.
तसं होता कामा नये, असं देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी एकत्र बसून आम्ही निर्णय घेतला की, शनिवारी आणि रविवारी देखील बंद राहणार.
या दोन दिवशी केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
बाकी व्यवहार सोमवार ते शुक्रवार चालू राहील.
तर आगामी शनिवार-रविवारी देखील ही परिस्थिती राहील.
असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Sangli News । रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आतापर्यंत 87 रुग्णांचा मृत्यू; प्रमुख डॉक्टरला अटक, सांगलीतील धक्कादायक प्रकार

तसेच, पुढे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) मृत्यूचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे यात 4 नामाकिंत हॉस्पिटल मधील गोळा केला आहे. याठिकाणी 53 टक्के मृत्यू हे 60 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत. 25 ते 60 वयोगटातील नागरिकांचे हे मृत्यू आहेत. यामध्ये बरेचशे तरुण-तरुणी आहेत. 43 टक्के मृत्यू हे कोणत्याही प्रकारची व्याधी नसलेल्या नागरिकांचे झाले आहेत, असंही त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Ajit Pawar deputy cm ajit pawar about pune restrictions on unlock say

हे देखील वाचा

SBI | पैसे काढण्यासाठी सतत बँकेत जाता का? मग जाणून घ्या ‘हे’ नियम अन्यथा भरावी लागेल ‘ही’ फी