Ajit Pawar | ‘मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे, तेवढी तरी राहुदे’ – अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | महाराष्ट्रात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) सध्या मुंबईत सुरु आहे. अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांत अनेक मुद्यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे दिसत आहे. दरम्यान अधिवेशनात कामकाजावेळी सदस्यांकडून आक्षेपार्ह हावभाव झाल्याने सर्वपक्षीय समन्वय समितीची (All-Party Coordinating Committee) बैठक घेण्यात आली होती. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात सर्वच सदस्यांना खडसावले आहे. ‘सर्व सदस्यांनी आदर्श आचार संहितेचं पालन केलं पाहिजे,’ असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

 

त्यावेळी बोलताना अजित पवार ( Ajit Pawar) म्हणाले, ‘काही जणांना कसलाही अनुभव नसतो पण पक्षामुळे ते निवडुन येतात. सदस्यांचे वर्तन कसे आहे. यावर सभागृहाची प्रतिमा ठरते. तर, सदस्यांचे वर्तन कसे असते, कसं वागलं पाहिजे याबाबत त्यांनी सभागृहात सांगितलं आहे.’ पुढे ते म्हणाले, ‘सकाळी बैठक झाली तेव्हा सर्व पक्षाचे गटनेते उपस्थित होते. पक्षीय जोडे बाजूला ठेवून चर्चा झाली. त्यावेळी सभागृहातील वर्तनाबद्दल सर्वांनीच चिंता केली. आता विधिमंडळ आवाराचे थेट प्रक्षेपण थेट होत असत म्हणून आपलं वर्तन साजेसे ठेवले पाहिजे. असं पवार म्हणाले.

‘विधिमंडळाच्या (Maharashtra Winter Session) आवारात प्राण्यांचा आवाज काढला जातो. खरंतर हा मतदारांचा अपमान आहे.
आपण मत दिलेला माणूस टिंगल टवाळी करतो की मतदान देणाऱ्यांना काय वाटेल.
कुत्री, मांजर आणि कोंबड्या या प्राण्यांचे नेतृत्व आपण करत नाही,
असं म्हणत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे नितेश राणेंवर (Nitesh Rane) निशाणा साधला.
तसेच, ‘आम्ही आमदार झालो तेव्हा अध्यक्षांचा, मंत्र्यांचा किती दरारा होता.
कोणी आलं तर त्यांना सभागृहात मान दिला जायचा. पण आता कुणीही येतं, कुठेही बसायला बघतं. इथेही येऊन बसतात.
मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे तेवढी तरी राहुदे बाबा, तुला बसायचं आहे तर पाठीमागे बस. कॅबिनेट मंत्र्यांच्या मागे आम्ही बसायचो,
आता एक पत्र झालं की दुसरं द्यायला येतात. एकदाच काय ते द्या,’ असं देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | deputy cm ajit pawar on code of conduct in assembly winter session

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | एखादा सदस्य चुकला तर 12-12 महिने बाहेर पाठवू नका, भाजपच्या ‘त्या’ 12 आमदारांच्या निलंबनाविरुद्ध अजित पवारांकडून अप्रत्यक्षरित्या समर्थन

Pankhuri Shrivastava | कोट्यधीश पंखुरी श्रीवास्तव यांचे 32 व्या वर्षी निधन; अखेरची सोशलवरील पोस्ट चर्चेत

Rohini Khadse | रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला हल्ला’