Ajit Pawar | राज्यातील शाळा आणि कॉलेज कधी सुरु होणार? अजित पवार म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Ajit Pawar | मागील दिड वर्षापासून कोरोनाच्या (Corona virus) महामारीमुळे शाळा, महाविद्यालये बंदच आहेत. मात्र सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याने राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं सुरू करावीत असा विचार आता राज्य शासनाकडून (State Government) केला जात आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्वाचं विधान केलं आहे. येत्या 2 ऑक्टोबरला राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थिती योग्य वाटल्यास वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबत योग्य ती नियमावली लागू करुन महाविद्यालयं टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा निर्णय मा. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं घेण्यात येऊ शकतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव किती आहे यावर शाळा आणि कॉलेजेस कधी सुरु होणार हे अवलंबून राहणार आहे.
असं अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं आहे. तर, राज्यात आपण मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली आहे.
त्यामुळे 18 वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही लसींचे दोन्ही डोस घेऊन आपलं लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

पुढें अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, लहान मुलांसाठी लस उपलब्ध करण्यात येणार आहे.
जागतिक आरोग्य संघटना तसेच केंद्र सरकारने (Central Government) लसीला परवानगी दिल्यानंतर शालेय मुलांना लस देण्याचा प्रयत्न अग्रक्रमाने करण्यात येईल.
जेणेकरून दिवाळीनंतर शाळा सुरू करणे सोयीचे होईल, अशी मानसिकता सरकारने ठेवली असल्याचंही पवार म्हणाले.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी राज्यातील महाविद्यालये येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय सांगितला होता.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनीही राज्यातील जिल्ह्यांची कोरोनाची स्थिती बघूनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असं सांगितलं होतं.
त्यातच आता अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

 

Web Title : Ajit Pawar | deputy cm ajit pawar statment about when schools and colleges reopening in state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Numismatist | 10 कोटीमध्ये विकले गेले 1 रुपयाचे हे नाणे ! काय आहे यामध्ये विशेष, तुमच्याकडे आहे का?

Pune Cyber Crime | माय लॅबचे बनावट ‘डोमेन’ बनवून नागरिकांची फसवणूक; पुणे सायबर पोलिसांकडून गुजरातमधील दोघांना अटक

Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांची राज्यपालांना विनंती; म्हणाल्या – ‘महिला सुरक्षेच्या संदर्भात BJP च्या पदाधिकाऱ्यांची विशेष कार्यशाळा घ्या’