Ajit Pawar-Devendra Fadnavis | शरद पवार यांच्या घरावर हल्ला ! अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या ‘सेम’ प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar-Devendra Fadnavis | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक (Silver Oak) निवासस्थानी संपकरी एसटी कामगारांनी (ST Workers Strike) प्रचंड मोठा गोंधळ घातला. 150 ते 200 एसटी कामगारांनी (MSRTC Worker) शरद पवार यांचा निषेध करत घराजवळ घुसखोरी केली. त्यावेळी चप्पल, दगडफेक देखील करण्यात आले, पोलिसांचीही तारांबळ उडाली. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकात आरोपांचे सत्र सुरू असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकच प्रश्न उपस्थित केला आहे. (Ajit Pawar-Devendra Fadnavis)

 

अजित पवार काय म्हणाले ?
”शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला पोलीस यंत्रणेचं अपयश आहे. पोलिसांना हे आधी कळलं नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच पुढे ते म्हणाले, आंदोलक शरद पवारांच्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती माध्यम प्रतिनिधींना मिळते. तिथे माध्यम प्रतिनिधी कर्मचाऱ्यांसोबत पोहोचतात. माध्यमांना जे कळलं ते पोलीस यंत्रणेला का कळलं नाही.” असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले, ”आंदोलक कर्मचाऱ्यांसोबत माध्यमांचे कॅमेरे पोहोचले. अर्थात ते माध्यमांचं कामच आहे. पण जे माध्यमांना जमलं, ते संबंधित यंत्रणेला का जमलं नाही, त्यांना हे का शोधून काढता आल नाही, तसेच पोलीस कमी पडले हे निर्विवाद सत्य आहे.”

 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?
”पोलीस आणि पोलिसांची यंत्रणा काय करत होती, गुप्तहेर खातं काय करत होतं,” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
तर, ”माध्यम प्रतिनिधींना माहिती मिळते.
त्यांना दुपारी अडीच वाजताच मेसेज येतात. मग ते आंदोलकांसोबत शरद पवारांच्या घराबाहेर पोहोचतात.
मग हे पोलिसांना कसं समजलं नाही, पवारांच्या घरावर झालेला हल्ला पोलिसांचं आणि गुप्तचर यंत्रणेचं अपयश आहे.”
असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :-  Ajit Pawar-Devendra Fadnavis | sharad pawar house attack ajit pawar and devendra fadnavis blames police for intelligence failure

 

Advt.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा