Ajit Pawar | ‘1 एकर जमिनीला 18 कोटी रुपये देणे व्यवहार्य नाही’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | पुण्यात (Pune) सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार यांनी भाषण केले. कामं वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे. लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा सल्ला त्यांनी कंत्राटदारांना दिला. दरम्यान, “काही ठिकाणी 1 एकर जमिनीसाठी 18 कोटी रुपये दिल्याची उदहारणे समोर आली. एक एकर जमिनीला 18 कोटी रुपये देणे व्यवहार्य ठरत नाही. असं देखील यावेळी पवार यांनी म्हटलं आहे.

 

अजित पवार (Ajit Pawar) बोलताना म्हणाले की, केंद्र, राज्य आणि मनपा तिघांनी समन्वय ठेऊन काम वेळेत पूर्ण केली पाहिजेत. “गडकरी साहेबांच्या कामाचा स्पीड आपल्याला माहित आहे. इथल्या नागरिकांना कमीत कमी त्रास कसा होईल. वेळेत काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार, महापालिकेने लक्ष द्यावं. राज्य सरकारची गरज असेल, काही अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी मी तयार असल्याचंही ते म्हणाले.

पुढे पवार म्हणाले, “काम गतीने, विकास गतीने झाला पाहिजे. याबत दुमत असण्याचं कारण नाही.
मधल्या काळात राज्य सरकारकडून जमिनीच्या बदल्यात मोबदला देण्याचा निर्णय झाले होता.
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत मोबदला देण्याचे प्रमाण जास्त होते. आता दर बदलायचे आहेत, असं ते म्हणाले. तर, “काही ठिकाणी एक एकर जमिनीसाठी 18 कोटी रुपये दिल्याची उदहारणे समोर आली. एक एकर जमिनीला 18 कोटी रुपये देणे व्यवहार्य ठरत नाही. एककाळ असा होता की, पैसे कमी मिळत असल्याने लोक वैतागले होते. आता लोक भेटतात तेव्हा रस्ता रानातून नेण्याची विनंती करता हा पूर्ण विरोधाभास आहे.

 

 

हे देखील वाचा

Pune News | अखिल काळे बोराटे नगर प्रतिष्ठानच्या वतीने अश्विनी योगेश सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, डोळे तपासणी कॅम्प संपन्न

Manohar Mama Bhosale | छातीत दुखू लागल्याने मनोहरमामा भोसले सोलापूर रुग्णालयात दाखल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Ajit Pawar | dont taste paitance of people ajit pawar in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update