Ajit Pawar | कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने वाढवा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील अनेक जिल्ह्यात राज्य सरकारच्या नियमावलीनुसार टप्याटप्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. परंतु कोल्हापूर (kolhapur) जिल्हयातील कोरोना (covid) रुग्णसंख्या काय कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर आज (सोमवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) हे कोल्हापूर दौऱ्यावर होते. कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना  चाचण्यांचं प्रमाण दुपटीने वाढवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

अजित पवार (ajit pawar) म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाची ही स्थिती कमी करण्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूरच्या जनतेला केलं.
जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रेट (Positive rate) वाढला तरी काही हरकत नाही पण चाचण्या दुपटीने वाढवा अशा स्पष्ट सूचना अजित पवार (ajit pawar) यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
कोल्हापुरातील लोक मास्क घालत नसल्याचे निदर्शनास आणून देत पोलिसांना पाहून लोक मास्क घालत असल्याचे सांगितले.
गरज पडल्यास कोल्हापूर जिल्ह्यात आणखी कडक निर्बंध करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच जिल्हा प्रशासनाला अथवा शासनाला कोणालाही त्रास द्यायचा आमचा हेतू नाही.
खासगी हॉस्पिटलनी उपचार करताना आवाजावी बिल घेऊ नये.
असे देखील अजित पवार (ajit pawar) यांनी म्हटलं आहे.

Salary Overdraft | नोकरदारांना खुशखबर ! तातडीची गरज भागवण्यासाठी खासगी आणि सरकारी बँका देत आहेत ‘ही’ सूविधा, जाणून घ्या

या दरम्यान, कोविडच्या पार्श्वभूमीवर गृहविलगीकरण कमी करून संस्थात्मक विलगीकरण वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे.
तसेच, पुढे अजित पवार (ajit pawar) म्हणाले, कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेकडे गांभीर्यांने पाहत लहान मुलांसाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
त्याचबरोबर सध्या ऑक्सिजन आणि फायर ऑडिटवर बराच खर्च होत आहे.
तर सीपीआर रुग्णालयाच्या फायर ऑडिटचा होणारा खर्च हा सरकार उचलणार असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलं आहे.

Web Title : Ajit Pawar Double the number of corona tests in Kolhapur district

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

BJP ला 750 कोटी देणगी देणारे ‘ते’ कोण ? उद्योगपतींच्या चाव्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडे ? जाणून घ्या सविस्तर