Ajit Pawar | तुम्ही भाषण कोणाचं ऐकणार? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | शिवसेनेत (Shivsena) झालेल्या बंडखोरीनंतर आजचा हा पहिलाच दसरा मेळावा (Dasara Melava 2022) होत असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटांना शक्तिप्रदर्शन करुन आपलीच शिवसेना खरी असल्याचा राज्यातील जनतेला दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज बारामती येथील एका कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलं आहे.

 

अजित पवार (Ajit Pawar) दसरा मेळाव्यावर बोलताना म्हणाले की, आज सकाळपासून मला पत्रकार विचारत आहेत की मी कोणाचे भाषण ऐकणार? उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकणार. मी त्यांना म्हटले की कारे बाबा, मी दोघांचेही भाषण ऐकणार, तुला काही त्रास आहे का?

 

अजित पवार पुढे म्हणाले, मी दोघांचीही भाषणे ऐकतो. कारण मी दोघांसोबत काम केलेले आहे. एकजण मुख्यमंत्री होते आणि एकजण आमच्या मंत्रिमंडळात (Cabinet) वरिष्ठ मंत्री म्हणून काम करत होते. शेवटी काय, आपण एकमेकांचे दुश्मन नाही आहोत. आपली विचारधारा वेगळी असू शकते, विरोधक वेगळे असू शकतात. मात्र आपली संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे यांचे काय मत आहे, त्यांचे काय मत आहे, हे काय बोलतायत, ते काय बोलतात, विचार कसे मांडतायत. तसेच ज्यांना सभोवताली काय घडतंय हे पाहण्याची उत्सुकता असते ते सर्वजण दोघांचेही भाषण ऐकतीलच.

 

कमरेखाली वार होता कामा नये

मात्र, असे असले तरी दोघांनीही बोलत असताना कमरेखाली वार होता कामा नये.
खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करता कामा नये.
ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही शिवाजी महाराजांची शिकवण नाही.
हा शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार नाही.
याचं भान आम्ही सगळ्याच राजकीय पक्षांच्या लोकांनी ठेवलं पाहिजे.
आपणही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे, असे ही अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | dussehra rally ajit pawar directly answered on whether he
will listen to uddhav thackeray speech or to cm eknath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा