Ajit Pawar | इलेक्ट्रीक गाडयांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  राज्यातील वाढते प्रदुषण व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रीक‍ गाडयांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. फिटवेल मोबिलीटी प्रायव्हेट लिमिटेडच्या (Fitwel Mobility Pvt Ltd) महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांसाठीच्या इलेक्ट्रीक थ्री-व्हिलर गाडयांच्या वितरण सेवेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते पिंपरी- चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त राजेश पाटील (pcmc commissioner rajesh patil), फिटवेल मोबिलीटी प्रा. लि.चे रवींद्र कंग्राळकर, चैतन्य शिरोळे, ए. शशांक, केदार, जगदीश कदम व कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, काळाची पावलं ओळखून भविष्याचा वेध घेऊन फिटवेल मोबिलीटी प्रायव्हेट लिमिटेडने इलेक्ट्रीक थ्री-व्हिलर गाडयांचे वितरण सेवा सुरु केली आहे. गेल्या काही वर्षापासून पिंपरी- चिंचवड एमआयडीसी ॲटो हब म्हणून ओळखली जाते. आता इलेक्ट्रीक वाहनांचे विक्री हब म्हणून नवीन ओळख पिंपरी -चिंचवड शहराला मिळेल. फिटवेल मोबिलीटीच्या माध्यमातून विक्री होणा-या इलेक्ट्रीक थ्री-व्हिलर गाडया या सर्व प्रकारच्या प्रदुषणापासून मुक्त असतील.

प्रवासी व मालवाहतूक क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण होईल.
पेट्रोल, ‍डिझेल, गॅस या इंधनाच्या मर्यादा लक्षात घेतल्या तर इलेक्ट्रीक मोटारी प्रवासी व मालवाहतूकीसाठी एक चांगला, माफक, स्वच्छ व प्रदुषणमुक्त, फायद्याचा पर्याय आहे.

या पुढच्या काळात इलेक्ट्रीक गाडयांना प्रोत्साहन व प्राधान्य देण्याचे भूमिका सरकारने घेतली आहे.
राज्यातलं वाढतं प्रदुषण आणि त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके लक्षात घेता
सरकारने नवीन इलेक्ट्रीक वाहन धोरण जाहीर केले आहे.
या धोरणानुसार राज्यात इलेक्ट्रीक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
इलेक्ट्रीक वाहन खरेदीला प्राधान्य मिळावे यासाठी राज्यातील प्रमुख शहरामध्ये सरकारी
व खाजगी चार्जिंग सुविधा उभारण्यात येणार आहेत.
पेट्रोल, डिझेलचे वाढणारे दर त्यामुळे होणारे प्रदुषण आणि ग्लोबल वॉर्मिंग या सर्व समस्येवर इलेक्ट्रीक वाहने हाच पर्यावरण पुरक असा चांगला पर्याय असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी फिटवेल मोबिलीटी कंपनी, मॅन-युनायटेड एचआर अँन्ड मार्केटींग कंपनी, चैतन्य सेल्स सर्विसेस कंपनी, इलेक्ट्रीक गाडयांच्या उत्पादन, विक्री,
देखभाल-दुरुस्तीच्या क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या संबंधीतांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Web Title : Ajit Pawar | Electric vehicles will be promoted and given priority – Deputy Chief Minister Ajit Pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | खुशखबर ! आता आई-वडील आणि ज्येष्ठांच्या देखरेखीसाठी मिळतील 10 हजार रुपये, मोदी सरकार बदलतंय ‘हा’ नियम

Ajit Pawar | लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बाहेर पडू द्या, अजित पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवू शकता तुम्ही पैसे, 10 हजाराच्या बचतीवर मिळेल 16 लाखांचा फायदा; जाणून घ्या कसे?