Ajit Pawar | स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार, पण…’, नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावर अजित पवारांचं ‘रोखठोक’ विधान

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव कमी झाला आहे. परंतु काही शहरांमध्ये (city) कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. राज्यातील कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट (Kolhapur positivity rate) सर्वाधिक असल्याने या ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कोल्हापूरचा दौरा केला. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. त्यांनी नियमांचे कडक (Strict rules) पद्धतीने पालन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी नुकतीच मुख्यमंत्रिपदाबाबतची (CM) महत्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली होती. यासंदर्भात अजित पवार (ajit pawar) यांना विचारले असता ते म्हणाले, नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष असून प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली, स्वप्न (dream) पाहण्याचा सर्वांना अधिकार आहे. उद्या तुम्हाला रिपोर्टवरुन चिफ एडिटर (Chief Editor) केले तर आवडणार नाही का ? असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी केला. प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा (Ambition) असते असेही ते म्हणाले.

 

आघाडीचा निर्णय तीन प्रमुख नेते घेतील

काँग्रेस (Congress) आगामी निवडणुका (upcoming election) स्वबळावर लढवणार असल्याचीही घोषणा पटोलेंनी केली. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, पक्षाचे प्रमुख (Party chief) म्हणून जे व्यक्ती आहेत, ते निर्णय (Decision) घेत असतात. कोणत्या पक्षाशी आघाडी करायची किंवा स्वबळावर निवडणूक लढवायची हा अधिकार काँग्रेसमध्ये सोनीया गांधी (Sonia Gandhi) यांना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) शरद पवार (Sharad Pawar) निर्णय घेतात. शिवसेनेत (Shivsena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) निर्णय घेतात. त्यामुळे आम्ही यावर भाष्य करणं योग्य नसल्याचे अजित पवार म्हणाले.

…अन्यथा निर्बंध शिथिल करणार नाही
कोल्हापूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अजित पवार (ajit pawar) यांनी नागरिकांना कडक इशारा Strict warning दिला आहे. नियमांचे पालन केले जात नसेल तर कोल्हापुरातील निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) करणार नाही. तर निर्बंध अधिक कडक करेन, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. शहरात ज्या ठिकाणी लसीकरण (Vaccination) जास्त आहे तिथे कोरोनाचा संसर्ग (Corona infection) कमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर शासनाचा भर आहे. शेवटी लसीकरण वाढवूनच कोरोनावर मात करणं शक्य असल्याचे अजित पवार म्हणाले.

Wab Title :- ajit pawar | everyone has right dream ajit pawar statement nana patole ambition cm of maharashtra

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

फुफ्फुसांची होतेय समस्या ! कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता

मुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा केवळ 95 रुपये आणि मिळतील 14 लाख, जाणून घ्या कसे?

इस्त्रायलमध्ये नवीन सत्ता ! 12 वर्षानंतर बेंजामिन नेतन्याहू यांना निरोप, नफ्ताली बेनेट बनले नवीन पंतप्रधान

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा