Ajit Pawar | भाजपा आमदाराच्या गोळीबार प्रकरणावर अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी, गृहमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar | भाजपा आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) यांनी उल्हासनगरच्या हिल पोलीस ठाण्यात (Hill Police Station) शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड (Shinde Group Leader Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार (Firing News) केल्याची खळबळजनक घटना काल रात्री घडली. या घटनेनंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान, या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अजित पवार म्हणाले, उल्हासनगरमधील घटना सर्वांनी पाहिली असून आमदार गायकवाड हे वैतागलेल्या माणसासारखे बोलत होते. मात्र संविधानाने दिलेल्या अधिकारांचा दुरुपयोग होणार नाही याची खबरदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे.

अजित पवार पुढे म्हणाले की, गायकवाड यांच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. रात्री उशिरा त्याबाबत आपल्याला माहिती मिळाली. वास्तविक कुणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. सगळ्यांना नियम आणि कायदे हे सारखेच असतात. संबंधित घटनेबद्दल मी माहिती घेणार आहे. याबाबत आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Helmet Compliance In Pune | कोण म्हणतेय पुणे शहरात हेल्मेट सक्ती नाही ! गतवर्षभरात हेल्मेट परिधान न करणार्‍या 4 लाख दुचाकीस्वारांना दंड

वाद मिटवणे पडले महागात, तरुणाला लोखंडी रॉड व दगडाने मारहाण; पेरणे फाटा येथील प्रकार

Firing In Police Station | भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार, जमिनीच्या वादातून गोळीबार (Video)

बोपदेव घाटात विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Pune News | मराठा समाज मागासलेपण पडताळणी सर्वेक्षण ! पुणे महापालिकेच्या हद्दीत 14 लाख 30 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण