Ajit Pawar | ‘आज गडी लय जोरात हाय… जास्त बोलत नाही’; अजित पवारांकडून राजेंद्र पवार यांना ‘कोपरखळी’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन –  बारामती येथे काल झालेल्या अटल इनोव्हेशन सेंटरच्या (Atal Innovation Center Baramati) उद्घाटन समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचे मोठे बंधू राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांच्या कोपरखळ्यांचा चांगलाच खेळ रंगला. आमचे बंधू आज लय जोरात होते. एखाद्याकडून काम करुन घ्यायचे असेल तर त्याला उभा, आडवा न करता काम गोडीगुलाबीने करुन घेतात. मात्र, त्यांच्या भाषणात सारखे चिमटे होते. जे काम असेल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करु. जास्त बोलत नाही. कारण ते आमचे मोठे बंधू आहेत, अशा शब्दांत अजित पवारांनी (Ajit Pawar) राजेंद्र पवारांना कोपरखळी मारली.

 

बारामती येथील अटल इनोव्हेशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते.
त्यापूर्वी प्रास्ताविकामध्ये अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेट सेंटर (Agricultural Development Center Baramati) ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी
कृषी महाविद्यालय व कृषी शिक्षणातील काही अडचणींबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पाच बैठका झाल्या.
मात्र कोणताही निर्णय झाला नाही, अशी तक्रार केली.
हाच धागा पकडून अजित पवार यांनी राजेंद्र पवार यांना, आज गडी लय जोरात आहे.
बंधुराज नोंद घेतलेली आहे एवढेच सांगतो, अशा शब्दांत कोपरखळी मारली.
अजित पवारांच्या या वक्तव्यावरुन सभागृहात चांगलाच हशा पिकला.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व्यासपीठावर उपस्थित होते.

 

मुख्यमंत्र्यांनी घेतली फिरकी

 

यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात हाच धागा पकडत अजितदादा आणि राजेंद्र पवार यांनी तुम्ही दोघांनी आधी ठरवा आणि मग
माझ्याकडे या आपण ते काम करण्याचा प्रयत्न करु दादांनी आडकाठी आणली तर आपण पवार साहेबांकडे जाऊन ते काम करु असे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

 

Web Title : Ajit Pawar | game tweezers between ajit pawar and rajendra pawar baramati presence sharad pawar and cm uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Cryptocurrency | ‘या’ 6 नाण्यांनी गुंतवणुकदारांना केले मालामाल, एका दिवसात झाला 2,340.75% पर्यंतचा फायदा

Pune Crime | CID मालिका पाहून 2 अल्पवयीन मुलांकडून 70 वर्षाच्या महिलेचा खुन ! सिंहगड रोड पोलिसांकडून ‘पर्दाफाश’, जाणून घ्या संपुर्ण स्टोरी

IBPS Recruitment 2021 | ‘या’ 11 सरकारी बँकांमध्ये निघाली 1828 पदांसाठी SOची बंपर व्हॅकन्सी, इथं करा अप्लाय