अजित पवारांनी सर्व समाजघटकांना न्याय दिला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना निनावी पत्र पाठवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काय चालले आहे याची माहिती देण्यात आली होती. तसेच या पत्रामध्ये अजित पवार यांच्याकडून फक्त मराठा समजातील लोकांना पदे दिली जातात आणि इतर समाजाला डावलले जात असल्याचा आरोप करण्यात आला. या लेटर बॉम्बमुळे पुणे शहर राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. यानंतर पुण्यातील दादा ग्रुपने एक पत्रक प्रसिद्ध केले असून त्याद्वारे अजित पवार यांनी इतर समजातील लोकांना देखील महत्वाची पदे दिली असल्याचे म्हटले आहे.

दादा ग्रुपने काढलेल्या पत्रकामध्ये, अजित पवार यांनी राष्ट्रवादीची सत्ता असताना दोन ओबीसी महापौर करताना दोन ओबीसी समाजाला स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केले. त्याचवेळी दलित समाजाला सभागृह नेते पद दिले. त्यावेळी अनेक मराठा समजाचे नेते ते पद मिळवण्यासाठी इच्छूक होते. मात्र अजित पवार यांनी जातीपेक्षा क्षमता हाच पर्य़ाय निवडला. तसेच पुण्याच्या राष्ट्रवादीचा पहिल्या आमदार ओबीसी समाजाच्या होत्या, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

त्यामुळे हे पत्रक विरोधकांनी काढले किंवा स्वकीयांनी काढले आहे. याला कोणत्याही प्रकराचे महत्व राहत नाही. विरोधक विरोध म्हणून त्यांची भुमिका मांडण्याचे काम करत असतात. परंतु यात कोणी स्वकीय असेल तर त्याला जाब विचारण्याचे काम दादा ग्रुप कडून केले जाईल, असे देखील पत्रकात म्हटले आहे. तसेच हे कोणत्याही पत्राला उत्तर दिले नसुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अजित पवार यांनी समाजातील सर्व घटकांना कसा न्याय दिला आहे. याचा खुलासा दादा ग्रुपकडून करण्यासाठी हे पत्रक काढण्यात आले असल्याचे म्हटले आहे. या पत्रकाची प्रत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे यांना पाठवण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like