विदर्भातील आणखी एका सिंचन घोटाळ्यातून अजित पवारांना ‘क्लीन चीट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. नागपूरनंतर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवार यांना अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्या प्रकरणी क्लीन चिट दिली आहे. या प्रकल्पातील अनियमितेची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्यात आली आहे. कायदेशीर बाबी तपासण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची होती. त्यांनी ते केले नाही. त्यामुळे अजित पवार यांना कोणत्याही गैरव्यवहाराप्रकरणी जबाबदार धरता येणार नाही असे प्रतिज्ञापत्र अमरावतीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागपूर खंडपीठात दाखल केले.

यात म्हणले आहे की अमरावती विभागाच्या विशेष पथकाने जिगाव आणि इतर सहा सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहार अजित पवार यांची भूमिका तपासली. अजित पवारांना देण्यात आलेल्या प्रश्नावलीची त्यांनी उत्तरे दिली आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंट रुल्स ऑफ बिजनेस अ‍ॅण्ड इन्स्ट्रक्शनमधील नियम आणि इतर पुरावे लक्षात घेऊन अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याची जबाबदारी निश्चित केली जाऊ शकत नाही.

विदर्भ विकास महामंडळाचे जल संसाधनमंत्रीच पदसिद्ध अध्यक्ष असतात. असे असले तरी महाराष्ट्र सरकारच्या कामकाजाविषयक नियमानुसार जल संसाधन विभागाच्या सचिवांनी तर विदर्भ पाटबंधारे विकास मंडळ कायद्यानुसार महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी सिंचन प्रकल्पांचे टेंडर, मंजूरी, खर्च यासारख्या बाबी तपासणे आवश्यक होते. त्यांनी त्यातील अवैधता जल संसाधन मंत्र्यांच्या निदर्शनास आणून घ्यायला हवी होते. परंतू तसे केल्याचे पुरावे नाहीत. एसीबीच्या प्रतिज्ञापत्रात म्हणले आहे की अधिकाऱ्यांच्या या कृतीसाठी अजित पवार यांना जबाबदार धरता येणार नाही.

Visit : Policenama.com

You might also like