अजित पवारांना मिळाला ‘आवडता’ बंगला, आदित्य ठाकरेंसह इतर मंत्र्यांना ‘कोण-कोणते’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकताच उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तार झाला. यानंतर आज नव्या नंत्र्यांना राहण्यासाठी शासनाकडून बंगल्यांच वाटप करण्यात आलं. यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र त्यांच्या पसंतीचा बंगला देण्यात आला आहे. अजित पवारांना मलबार हिल येथील देवगिरी बंगला देण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरेंचे पुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांना मत्रालयासमोरील अ-6 बंगला देण्यात आला आहे. भाजप सरकारच्या काळात हा बंगला तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आला होता. यावेळी हा बंगला आता आदित्य ठाकरेंना देण्यात आला आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मेघदूत, अनिल देशमुखांना ज्ञानेश्वरी, राजेश टोपे यांना जेतवन, दिलीप वळसे पाटील यांना शिवगिरी, राजेंद्र शिंगणे यांना सातपुडा बंगला देण्यात आला आहे. शासनानं आज बंगला वाटपाबाबत परिपत्रक काढलं आहे. यात कॅबिनेट आणि राज्यमंत्री मिळून एकूण 36 मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना यापूर्वी अ 9 बंगला देण्यात आला होता. परंतु त्यांचाही बंगला आता बदलण्यात आला आहे. त्यांना आता अवंती 8 हा बंगला देण्यात आला आहे.

उर्वरीत मंत्र्यांपैकी कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला ?

वर्षा गायकवाड- ब 4
सुनिल केदार- ब 7
विजय वडेट्टीवार- अ 3
अमित देशमुख- अ 4
हसन मुश्रीफ- ब 5
नवाब मलिक- अ 5
उदय सामंत- ब 2
जितेंद्र आव्हाड- ब 1
संजय राठोड- क 1
दादाजी भुसे- ब 3
गुलाबराव पाटील- क 8
बाळासाहेब पाटील- क 6
अस्लम शेख- क 2
शंकरराव गडाख- सुरूची 16
केसी पाडवी- क 3
अनिल परब- क 5
संदीपान भुमरे- क 4
अब्दुल सत्तार- सुरूची 15
धनंजय मुंडे- अ 9
आदित्य ठाकरे- अ 6
यशोमती ठाकूर- ब 6
शंभुराज देसाई- यशोधन 12
दत्रातय भरणे- अवंती 1
सतेज पाटील- सुरूची 3
बच्चू कडू- रॉकहिल टॉवर 1202
विश्वजित कदम- निलांबरी 302
संजय बनसोडे- रॉकहिल टॉवर 1203
आदिती तटकरे- सुनिती 10
राजेंद्र यड्रावकर पाटील- सुरूची 2
प्राजक्त तनपुरे- निलांबरी 402

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/