उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला संजय राऊतांना सबुरीचा ‘सल्ला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राम मंदिराच्या (Ram temple) मुद्द्यावरून भाजपा कार्यकर्ते अन् शिवसैनिकांमध्ये (BJP-Shiv Sena POlitics) शिवसेना भवनासमोर झालेल्या तुफान राड्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena leader MP Sanjay Raut) यांनी भाजपाला रोखठोक इशारा दिला आहे. शिवसेना भवनवर कोणी चालून आले तर मराठी माणूस गप्प बसेल काय? शिवसेना ही सर्टिफाइड गुंडा पार्टी आहे. मराठी माणसाकड वाकड्या नजरेन पाहणाऱ्यांना आम्ही गुंडगिरी दाखवू असे राऊत म्हणाले होते. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांना विचारल असता त्यांनी अप्रत्यक्षपणे राऊतांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegramfacebook page and Twitter for every update

राम मंदिराच्या जमीन खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्यावरून शिवसेनेन भाजपवर टीकेची झोड उठवली होती.
त्याचा निषेध करण्यासाठी भाजपने शिवसेना भवनवर फटकार मोर्चा काढला होता.
यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने झटापट झाली होती.
शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाणीचा आरोप केला होता.
तर भाजपच्या काही नेत्यांनी जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला होता.
राऊत यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले होते. राऊतांच्या वक्तव्याबद्दल पत्रकारांनी अजित पवारांना (Ajit Pawar) प्रतिक्रिया विचारली.
त्यावेळी त्यांनी अशा प्रतिक्रिया घेण्यापेक्षा सरकारच्या कामाविषयी बातम्या देण्याची विनंती पवारांनी पत्रकारांना केली.
त्यानंतर मात्र त्यांनी आपलं मत मांडल. कधी-कधी कोणीतरी काही बोलत असत.
कुठलाही पक्ष स्वत:ला गुंड म्हणवून घेणार नाही.
आज शिवसेनेचे नेते राज्याचे प्रमुख आहेत. कायद्याने अन् नियमाने राज्य चालवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उध्द्व ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) स्वत: तसे काम करत असल्याचे ते म्हणाले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegramfacebook page and Twitter for every update

Web title : ajit pawar give advice to shiv sena mp sanjay rauts on gunda party comment

हे देखील वाचा

PM Narendra Modi | लोकप्रियतेत पीएम नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट नेते; जो बायडन यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना टाकलं मागे

धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित

Pune City | पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसातही 9 झाडपडीच्या घटना

Serum Institute of India | सीरम पुढील महिन्यापासून मुलांसाठी सुरू करणार कोवोव्हॅक्सची ट्रायल ! सप्टेंबरपर्यंत लाँचिंगची अपेक्षा