अजित पवारांनी भरसभेत कार्यकर्त्याला दिलं विधानसभेचं ‘तिकीट’ !

परभणी : पोलिसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे बेधडक बोलण्यासाठी ओळखले जातात. परभणीच्या सभेत त्यांनी एका कार्यकर्त्याला चक्क विधानसभेचं तिकीट देवू केलं. तसंच लोकसभेत पराभव झाल्यानंतर विधानसभेचं तिकीट मागणाऱ्याची चांगलीचं फिरकी घेतली.

राजेश विटेकर हे लोकसभेला पराभूत झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून त्यांना विधानसभेला तिकीट देण्याची मागणी करण्यात येत होती. यावेळी भर सभेत अजित पवारांनी कार्यकर्त्यांची फिरकी घेतली ते म्हणाले, लोकसभेला पराभूत झालेले उमेदवार पुन्हा विधानसभेला तिकीट मागतो. आणि मग जिल्हा परिषदेला, ग्रामपंचायतीला आणि शेवटी सोसायटीला, धन्य आहे तुमचं. या तुमच्या पाया पडतो असे म्हणत अजित पवारांनी आपल्या खिशात हाथ घालून हे घे तिकीट असं म्हणत कार्यकर्त्यांला तिकीट दिलं.

पराभूत झालेल्या उमेदवाराकडून पुन्हा तिकीट मागणाऱ्यांचा खास आपल्या शैलीत दादांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. दादांनी खिशात हाथ घालून, हे घे तिकीट असे म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like