अजित पवार गटाला १२ मंत्रीपदे, १५ महामंडळ ? मात्र, पवारांबरोबर केवळ २ आमदार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रात्री चर्चा झाली असून त्यात अजित पवार यांच्या गटाला १२ मंत्रीपदे आणि १५ महामंडळे देण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण आता अजित पवार यांच्या गटातील समजले जाणारे आणखी तीन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुन्हा परतले आहेत. त्यामुळे आता आण्णा बनसोडे आणि अनिल पाटील हे दोन आमदार अजित पवार यांच्याबरोबर राहिल्याचे सांगण्यात येत आहे.

अजित पवार यांना पाठिंबा देणारे जवळपास सर्व आमदार आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले असल्याचे सांगण्यात येत असले तरी ते प्रत्यक्ष सभागृहात कोणाला मतदान करीत हे अजूनही सांगता येत नाही. दुसरीकडे अजित पवार यांच्याबरोबर २७ आमदार असल्याचा दावा भाजपाने केले आहे. अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर तेथून थेट विमानाने दिल्लीला गेलेले तीन आमदार हे आता दिल्लीहून पुन्हा मुंबईत परत आले आहेत. त्यांच्यातील अनिल पाटील यांनी प्रथमच उघडपणे आपण अजित पवार यांच्याबरोबर असल्याचे सांगितले आहे.

केवळ दोन आमदार संपर्कात नाहीत, एक स्वत: अजित पवार आणि दुसरे अण्णा बनसोडे. या तीन आमदारांना परत आणण्यात एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे आता प्रत्यक्ष विधानसभेत मतदानाच्या वेळी कोण कोणाच्या पाठीशी उभे राहतात, यावर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार तरणार की बुडणार हे नक्की होणार आहे.

Visit : Policenama.com