Ajit Pawar Group | अजित पवार गटाचे विधीमंडळाच्या नोटिसीला 260 पानी उत्तर, राष्ट्रवादी पक्ष आमचाच असल्याचा केला दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) समर्थक आमदारांना पक्षविरोधी कृती केल्यामुळे अपात्र का करू नये, अशी याचिका अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) विधीमंडळात दाखल केली होती. यानंतर विधीमंडळाने दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस बजावली होती. यावर अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) विधीमंडळाच्या नोटीसीला २६० पानांचे उत्तर सादर केले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळ आमचाच आहे, असा दावा केला आहे.

आमचा गट हाच मूळ राष्ट्रवादी आहे. कारण पक्षाचे विधानसभेचे प्रदोत अनिल पाटील (Pradot Anil Patil) हे आमच्या बाजूने आहेत. तसेच आमदारांची संख्या देखील आमच्याकडे जास्त आहे. त्यामुळे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे. त्यामुळे यासंदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) विधीमंडळाला केली आहे.

दरम्यान, विधीमंडळाने शरद पवार गटाला देखील आमदार अपात्रता प्रकरणी (NCP MLA Disqualification Case)
नोटीस बजावली होती. शरद पवार गटाच्या आठ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली होती. विधिमंडळाच्या नोटिसीला
शरद पवार गटाच्या प्रत्येक आमदाराने विधानसभा अध्यक्षांकडे दहा पानी उत्तर सादर केले आहे. आता विधानसभा
अध्यक्ष जो निर्णय घेतील तो महत्वाचा ठरणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | विवाहितेचा विनयभंग करुन पळवून नेण्याची धमकी, शिवाजीनगर परिसरातील घटना

Adv Pramod Bombatkar | अ‍ॅड. प्रमोद बोंबटकर यांच्याकडे ‘जिल्हा सरकारी वकील (DGP) पदाचा अतिरिक्त पदभार

Pune Drug Case | ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील ‘उद्योगी’ कर्मचार्‍याला अटक; ससूनमधील भानगडी समोर येणार?

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जहरी टीका, ”असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक”

Pune Crime News | पुणे : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 13 लाखांची फसवणूक