Ajit Pawar Group | अजित पवार गटाने मंत्रालयाबाहेर लावलेला बॅनर चर्चेत, ‘बारामतीच्या भावी खासदार सुनेत्रा पवार’

मुंबई : Ajit Pawar Group | कर्जतच्या शिबिरात अजित पवार यांनी सातारा, शिरुर, रायगड आणि बारामती या चार लोकसभा मतदारसंघांमध्ये आपण उमेदवार देणार असल्याचे म्हटले होते. यानंतर मुंबईत मंत्रालयाबाहेर लागलेल्या एका बॅनरमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. (Ajit Pawar Group)

सुनेत्रा अजितदादा पवार (Sunetra Ajit Pawar) बारामतीच्या भावी खासदार, असे या बॅनरवर लिहिले आहे. बॅनरवर सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाच्या काही नेत्यांचे फोटो आहेत. हा बॅनर मुंबईत लागल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) नणंद विरूद्ध भावजयी अशी लढत बारामती मतदार संघात (Baramati Constituency) होणार अशी शक्यता मागील काही दिवसांपासून वर्तवली जात होती. परंतु, कर्जतच्या शिबिरात अजित पवार यांनी केलेल्या घोषणेनंतर यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) ताकद दोन भागात विभागली गेली आहे. आता दोन्ही गट आमने-सामने येऊन एकमेकांवर कुरघोड्या करू लागले आहेत. आपसातील हा वाद आता कौटुंबिक पातळीवर पोहचला आहे. आता पवार कुटुंबातील दोन महिला लोकसभेला आपसात लढण्याची शक्यता आहे. (Ajit Pawar Group)

बारामती हा सुप्रिया सुळेंचा (Supriya Sule) लोकसभा मतदार संघ आहे त्या मतदारसंघातून सुनेत्रा पवारांना उभे
करण्याचा विचार अजित पवार गटाने केल्याने येथील निवडणूक पवार विरूद्ध पवार अशी होण्याची शक्यता आहे.
भाजपाने बारामती मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी मागील दोन वर्षापासून तयारी सुरू केली आहे.
परंतु, आता अजित पवारांना सोबत घेत भाजपाने आपले काम हलके केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Bhidewada Smarak | ऐतिहासिक भिडे वाडा सरकारजमा, सोमवारी रात्री 11 वाजता कडेकोट बंदोबस्तात इमारत घेतली ताब्यात

आर्थिक देवाण घेवाणीतून खून, कोंढवा पोलीस व गुन्हे शाखेकडून 10 तासात आरोपी गजाआड

पुणे : महिलेकडे शरीर सुखाची मागणी, पिस्टलचा धाक दाखवून घरच्यांना मारण्याची धमकी

तरुणीला मारहाण करुन फोटो व्हायरल करण्याची धमकी, कर्वेनगर परिसरातील घटना

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sindhudurg | पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

CM Eknath Shinde On PM Modi | सिंधुदुर्गतील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधानांचे कौतुक, ”गॅरंटीचं दुसरं नाव मोदी”