अजित पवारांना ‘ब्लॅकमेल’ केलं, ते पुन्हा परतणार : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधारात फक्त पाप केलं जातं, अजित पवारांना ब्लॅकमेल केलंय ते आम्हाला माहिती आहे, चंद्रकांत पाटलांनी त्यांचा पक्ष सांभाळाला अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी दिलं आहे. धनंजय मुंडेंचा देखील संपर्क झाला आहे, अजित पवार देखील परत येतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

 

अजित पवार यांना कसं ब्लॅकमेल केलं हे सर्व आमच्याकडं आहे, त्यापाठीमागे कोण आहे, याचा सर्व खुलासा सामनामध्ये होणार असं देखील राऊत म्हणाले. चोर, दरोडेखोर जसं काम करतात तसं काहीसं राज्यात झालं आहे. अजित पवार हे परत राष्ट्रवादीमध्ये येवु शकतात असं सूचक विधान राऊतांनी केलं आहे.

Visit : Policenama.com

You might also like