राष्ट्रवादीकडे 41 आमदार ? सुप्रीम कोर्टातील पत्रामुळं नवी माहिती समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यात झालेल्या सत्ता स्थापनेच्या भूकंपानंतर काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. यावेळी अजित पवारांनी आमदारांना विश्वासात न घेता आमदारांचे संमतीपत्र दिल्याचे अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयात सांगितले तसेच अजित पवार यांना आता विधिमंडळ नेते पदावरून हटवण्यात आलेले आहे यासाठी अभिषेक मनु सिंघवी यांनी आता राष्ट्रवादीकडे ४१ आमदारांचे समर्थन आहे असे सांगत ४१ आमदारांचे संमतीपत्र देखील न्यायालयात दाखल केले.

एकूणच भाजपने पुरेसे संख्याबळ नसताना घाईघाईत राज्यपालांची फसवणूक करून हा सर्व कार्यक्रम केला असल्याचा युक्तिवाद करण्यासाठी अजित पवारांनी आमदारांना विश्वासात न घेता हा निर्णय दाखवल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यावेळी अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित पवार यांना विधिमंडळ नेते पदावरून हटवल्याचे देखील सांगितले आहे.

बहुमताची चाचणी लवकर घ्यावी
न्यायालयाने भाजपकडे बहुमत आहे तर एवढा वेळ बहुमत सिद्ध करण्यासाठी न घेता आजच विधासभेत आपले बहुमत सिद्ध करावे अशी मागणी अभिषेक मनु सिंघवी यांनी यावेळी न्यायालयात केली आहे. तसेच कर्नाटकाप्रमाणे या ठिकाणी होऊ नहे यासाठी विश्वास दर्शक ठराव हा गुप्त पद्धतीने घेतला जाऊ नहे अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com