Ajit Pawar | ‘माझी महिलांना विनंती आहे, जास्त पलटण वाढवू नका’, अजित पवारांचा सल्ला अन् एकच हश्शा

0
438
Ajit Pawar | have only two children ncp leader ajit pawar family planning advice in baramati
File Photo

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – महिलांना विनंती केली की, दोन अपत्यांवर थांबा. जास्त पलटण वाढवू नका. वंशाच्या दिव्याच्या मागे लागू नका. पवार साहेब (Sharad Pawar) एका मुलीवर थांबले. तसे तुम्ही देखील थांबा. नाहीतर म्हणाल की देवाची कृपा, आम्हाला माहिती आहे कोण कृपा करतं, अशी फटकेबाजी अजित पवार ( Ajit Pawar) यांनी केली. अजित पवार (Ajit Pawar) आज (रविवारी) बारामती दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते.

 

अजित पवार (Ajit Pawar) आज बारामती दौऱ्यावर असून त्यांनी शहरातील विकास कामांची पाहणी केली. यानंतर गरजू महिलांना एक हजार स्वेटर, 500 साडी तसेच 15 शिलाई मशीनचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

 

अजित पवार म्हणाले, माझी महिलांना विनंती आहे, आपली सून आली, मुलगी असेल, तिचं लग्न झालं तर दोन अपत्यांवर थांबा. पोरी सोन्यासारख्या असतात. जास्त पलटण वाढवू नका. वशांच्या दिव्याच्या मागे लागू नका. पवार साहेब एका मुलीवर थांबले. सुप्रियाताईंनी (Supriya Sule) नाव काढलं नाही का? नुसतं पोरगचं पाहिजे, असं करु नका. तुम्ही देखील थांबा नाहीतर म्हणाल, देवाची कृपा. देव वरुन देतोय, आम्हाला माहिती नाही का कुणाची कृपा आहे, असं म्हणताच सभागृहात एकच हश्शा पिकली.

 

कोयता-फोयता गँग चालणार नाही

समाजात महिलांकडे कोणी वेड्या वाकड्या नजरेने बघू नये, कोणी दहशत गुंडगिरी पसरवण्याचे काम करु नये.
कोयता किंवा फोयता गँग (Koyta Gang) आसलं अजिबात चालणार नाही याची नोंद पोलीस खात्याने घ्यावी
मी कधीही चुकीच्या गोष्टीवर पांघरुण घालणार नाही.
बारामतीत वेडे वाकडे धंदे होता कामा नयेत, असेही अजित पवार यांनी सांगितले.

 

 

Web Title :- Ajit Pawar | have only two children ncp leader ajit pawar family
planning advice in baramati

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा