Ajit Pawar | 6 जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शुभेच्छा, अजित पवारांची फडणवीसांवर खोचक टीका, मोदींवरही नाव न घेता साधला निशाणा, म्हणाले…

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – मीसुद्धा बारामतीला (Baramati) आईला भेटायला येतो, मात्र फोटो काढत नाही, असा टोला अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना नाव न घेता लगावला. अजित पवार (Ajit Pawar) आज बारामतीच्या दौर्‍यावर असताना त्यांनी ही टीका केली.

 

एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मला काठेवाडीवरून मुंबईला पाठवले. गेलो ना तिथे. राहतोय ना तिथे. कधी म्हटले का मला राहायचे आहे. मला राहायचे आहे. मीसुद्धा आईला भेटायला येतो पण फोटो काढत नाही. भेट घेतो आणि जातो. आताही ही सभा संपल्यावर आईला भेटायला जाणार आहे.

 

शिंदे-फडणवीसांनी केलेल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांनी घेतलेल्या सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावर खोचक टीका करताना अजित पवार म्हणाले,
एक जिल्हा सांभाळताना मला नाकी नऊ येत होते.
6-6 जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद घेणारे काम कसे करणार? तरीही देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा.

 

बारामतीमधील सहकारी संस्थ्यांच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, जी जबाबदारी जनता आपल्यावर देईल.
आपले वरिष्ठ आपल्यावर देतील. आपले सहकारी आपल्यावर देतील. आपले सभासद आपल्यावर देतील.
त्यापद्धतीने तुम्हाला मला वागावच लागेल.

 

Web Title :- Ajit Pawar | i come to baramati to meet my mother but do not take pictures ajit pawars taunt to narendra modi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

S. Jaishankar | युद्धात भारत कोणाच्या बाजूने?, संयुक्त राष्ट्राच्या महासभेत एस. जयशंकर यांनी दिले ‘हे’ उत्तर

IND vs ENG | भारताच्या दीप्ती शर्माने चेंडू न टाकताच घेतली विकेट

CM Eknath Shinde | ते बंड फसले कारण त्यावेळी अजित पवार होते, यावेळी…, एकनाथ शिंदे यांनी सांगितला फरक