Ajit Pawar | ‘म्हणून मी सरकारमध्ये आलो…’, कॅबिनेटनंतर अजित पवारांच्या विधानाची चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ (Maharashtra DyCM Oath) घेतल्यानंतर 48 तासात कॅबिनेटची पहिली बैठक (Maharashtra Cabinet Meeting) आज पार पडली. या बैठकीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नवनिर्वाचीत मंत्र्यांनी सहभाग घेतला. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, विकासाच्या मुद्यासाठी आपण सरकारमध्ये आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे देशाचा विकास करत आहेत. 2024 च्या निवडणुकांमध्ये त्यांना पर्याय नाही असंही पवार यांना सांगतले. तसेच राष्ट्रवादीत (NCP) सरकारमध्ये आल्याने कुणीही नाराज नाही, असंही अजित पवार यांनी सांगितले.

आम्हाला काही विशेष वाटलं नाही

कॅबिनेट काही आम्हाला नवी नाही. काही वेगळं वाटलं नाही. कारण एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि मी अडीच वर्ष सत्तेत होतोच. तसेच भाजपात (BJP) असे काही मंत्री आहेत उदा. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यासह आम्ही काम केले आहे. त्यामुळे पहिल्या कॅबिनेटबाबत आम्हाला काही विशेष वाटलं नाही. राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आम्ही चर्चा केली. मला काही फार काही वेगळं वाटलं नाही, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं.

…म्हणून सरकारमध्ये आलो

मी विकासाच्या मुद्यासाठी या सरकारच्या बरोबर आलो आहे. देशपातळीवर विचार केला तर आज नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही. आज सगळे विरोधक विस्कळीत आहेत. देश मोदींच्या नेतृत्वात आगेकूच करत आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे या भावनेतून सरकारमध्ये सामील झालो आहोत, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

एकत्र काम करणार

आम्ही आता एकत्र काम करायचं ठरवलं आहे. त्यामुळे कुठलीही नाराजी नाही. कुणालाही कसली अडचण नाही. यासंदर्भात जेव्हा एका पक्षात विस्तार होतो किंवा पदांचं वाटप होतं तेव्हा मतमतांतर असू शकतात. मात्र सगळ्यांचं म्हणणं ऐकल्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. ते तो निर्णय योग्य पद्धतीने घेतील असा मला विश्वास आहे, असेही अजित पवार म्हणाले.

Web Title : Ajit Pawar | i have join the government due to this reason said ajit pawar after first cabinet meeting

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | तारण ठेवलेले दागिने मोडून जबरदस्तीने कार नेली; 18 लाखांची मागणी करणाऱ्या सावकराला अटक

Mumbai Agra Highway Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, कंटेनर हॉटेलमध्ये घुसून 12 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या बहाण्याने केली लाखो रुपयांची फसवणूक

Amol Kolhe | अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार?

Pune Crime News | पुणे: गुन्हे शाखेतील पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल ! 2 पोलिस, महिलेसह 5 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा

LPG Gas Cylinder Price | व्यावसायिक एलपीजी सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन दर

Petrol-Diesel Price Today | तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या

Maharashtra Monsoon Update | अनेक भागात पावसाची संततधार; कोकणात ‘ऑरेंज’ तर विदर्भासह मराठवाड्यात ‘यलो अलर्ट’