Ajit Pawar | ‘शरद पवारांनी संधी असताना अजित पवारांना मुख्यमंत्री केलं नाही;’ उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला उपरोधिक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेत अजित पवारांनी (Ajit Pawar) आज अनेक विषयांवर चर्चा केली व कोण मुख्यमंत्री झाले, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. मात्र, मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की, संधी असतानाही अजितदादांना शरद पवारांनी (Sharad Pawar) मुख्यमंत्री पद का दिले नाही. ती संधी त्यांना २००४ यावर्षी होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे (NCP) उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आले होते. ज्याचे जास्त उमेदवार त्याचा मुख्यमंत्री असा तुमचा फॉर्म्युला होता. तरी पण मुख्यमंत्री (CM) पद तुम्हाला मिळाले नाही, प्रत्युत्तरादाखल असा उपरोधिक टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला.

अमृता फडणवीस प्रकरणी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते की, एकदा अमृताशी (Amruta Fadnavis) बोलणार आहे. परंतु दादा असं बोलताना तुम्ही तरी सुनेत्राताईंना विचारलं होतं का? असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. तुम्ही मंत्रिमंडळात (Cabinet) एकाही महिलेला मंत्रिपद दिले नाही. याविषयी अमृता वहिनींना सांगू का ? असे अजित पवार म्हणाले होते. त्याच्या प्रत्युत्तरादाखल फडणवीस यांनी असे उत्तर दिले.

तुम्ही मला ट्विटद्वारे फॉलो करा
विरोधी पक्षनेते अजित पवारांचे बोलणे नेहमीच कडक आणि रोखठोक असते. परंतु, यावर्षी अजित पवारांचे भाषण आहे असे वाटले नाही. त्यामध्ये अर्धेअधिक जयंत पाटील (Jayant Patil) यांचेच वाटले. सभागृहात जयंत पाटील नसतानाही तुमच्या भाषणात त्यांनी लिहिलेलं आहे की काय, असे तुमच्या भाषणातून जाणवत होते. मी वीजतोडीचा जीआर ट्विटदेखील केला आहे. याबरोबर फेसबुकरही शेअर केला. आता सर्वांना पाठवूनही दिला, तरी पण तुम्हाला कसा काय दिसला नाही. त्यामुळे दादा तुम्ही आता मला ट्विटरवर फॉलो करा, असा उपरोधिक टोला देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लगावला.

विरोधी पक्षनेते पवार काय म्हणाले?
मविआचे सरकार होते, त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री होते. आता तुमची सत्ता आहे. तुम्ही सरकारमध्ये आहात. तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील कामे करताना किती अडचणी येतात, याबाबत स्वतःला प्रश्न विचारा. तीच गोष्ट पालघर जिल्ह्याबाबत घडते. एकनाथ शिंदे गटातील (Eknath Shinde Group) कुणीही आलं की ते काम लवकर होतं. चंद्रकांतदादा किंवा मुनगंटीवार कुणीही विरोध करा, पण ही वास्तवता आहे, असं अजित पवार म्हणाले. आम्ही सत्तेत होतो, आमचं सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा कधी अहंकाराला थारा दिला नाही, असंही अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचे आमदार जास्त असताना नेमकं काय घडलं होतं?
विधानसभेच्या २००४ मधील निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ६९, तर राष्ट्रवादीला ७१ जागा मिळाल्या.
फॉर्म्युल्यानुसार ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार,
असा ठराव काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांमध्ये झाला होता.
या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला पिछाडीवर टाकत ७१ जागा जिंकल्या होत्या.
मात्र, पक्षात अंतर्गत वाद होऊ नये अथवा कुरघोडीचं राजकारण होऊ नये म्हणून शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपद
हे काँग्रेसला दिलं होतं. त्यामुळे संधी मिळूनही अजित पवारांना मुख्यमंत्री होता आले नाही.
त्यावेळी २००४ मध्ये काँग्रेसचे विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) मुख्यमंत्री झाले.
यावरूनच आज देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांना टोला लगावला.

Web Title :- Ajit Pawar | in 2004 sharad pawar did not make ajit pawar the chief minister despite getting a chance said devndra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shruti Haasan | श्रुती हासनने सिनेसृष्टी बद्दल केले ‘हे’ मोठे वक्तव्य; म्हणाली “मी कधीही दिखावा केला नाही…”

Uddhav Thackeray | त्यांची नजर वाईट आहे, त्यामुळे आरएसएसने काळजी घेण्याची गरज; मुख्यमंत्र्यांच्या आरएसएस कार्यालय भेटीवर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य…