‘अजित पवार मुंबईतच’ : अजित पवारांच्या बारामतीला जाण्याबाबत शरद पवारांचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘अजित पवार मुंबईतच आहेत’ असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. अजित पवार तडकाफडकी बैठकीतून बाहेर का पडले आणि ते बारामतीला का निघाले आहेत असे विचारल्यानंतर पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार कुठेही गेलेले नाहीत. ते उद्या परत येतील असे शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले, “अजित पवार मुंबईतच आहेत. बैठका सुरू आहेत, उद्या ते येतील. गंमतीने ते काही बोलले असतील. काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे. राजकारणात काही गोष्टींना घेऊन गुप्तता पाळायला लागते. कुठेही निघालं की पत्रकारांच्या गाड्या मागे असतात. आम्हाला जराही प्रायव्हसी मिळत नाही. त्यामुळे अजित पवारांनी गंमतीनं म्हटलं असेल की, बैठक रद्द झाली आणि मी बारामतीला जातो आहे.”

दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आमची बैठक सोडसात वाजता होणार आहे असं सांगितलं होतं. परंतु अचानक आम्हाला निरोप आला की, काही कारणास्तव ही बैठक रद्द झाली आहे. आताची बैठक उद्या होऊ शकते. आमची बैठक होणार आहे. कोणतेही तर्कवितर्क लावले जाऊ नयेत” असे ते म्हणाले.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like