Ajit Pawar in Traffic Jam | पुण्यातील पावसाचा अजित पवारांना फटका, वाहतूक कोंडीत अडकले अन्… (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar in Traffic Jam | आज (शनिवार) सायंकाळपासून पुणे आणि परिसरात मुसळधार पाऊस (Heavy rain) पडत आहे. पुण्यात पडत असलेल्या पावसाचा फटका राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना बसला आहे. (Ajit Pawar in Traffic Jam) अजित पवार रात्री 8.30 वाजता लोहगाव विमानतळावरुन (Lohgaon Airport) भोसलेनगर (Bhoslenagar) येथील त्यांच्या निवासस्थानाकडे जात होते. मात्र, मुसळधार पावसामुळे झालेल्या वाहतूक कोडींत (Traffic Jam) एक तासाहून अधिक काळ अडकले. त्यानंतर अजित पवार पुढे नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात अडकले आहेत.

 

 

सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे लोहगाव (Lohgaon), धानोरी (Dhanori),
विश्रांतवाडी (Vishrantwadi), येरवडा (Yerawada)आणि नगर रोडला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.
मुसळधार पावसाने रस्त्यांना नाल्याचे स्वरु आल्याने नगर रस्त्यासह विमानतळ, लोहगाव,
धानोरी या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अजित पवार यांना तब्बल एक तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले.

दरम्यान, अजित पवार वाहतूक कोंडीत अडकल्याने पुणे वाहतूक विभागासह (pune police traffic branch)
स्थानिक पोलिसांची (local police) चांगलीच धावपळ झाली.
वाहतूक पोलिसांनी तातडीने पावले उचलत या मार्गावरील वाहतूक सुरळीत करुन अजित पवार यांच्या वाहनांच्या ताफ्याला वाट मोकळी करुन दिली.

Web Title :- Ajit Pawar in Traffic Jam | Ajit Pawar hit by rains in Pune, stuck in traffic jam in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

दमदार इंजिन असलेली Royal Enfield Bullet 500 येथे मिळेल 75 हजारात, कंपनीकडून मिळेल 12 महिन्यांचा वॉरंटी प्लान

Back pain | पाठदुखीकडे कधीही करू नका दुर्लक्ष, असू शकतो ‘हा’ असाध्य आजार; जाणून घ्या

Pimpri Police | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आणखी एका पोलीस ठाण्याला मान्यता

Param Bir Singh | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याबाबत सस्पेन्स कायम ! क्राइम ब्रँचनं उचललं ‘हे’ पाऊल

Pune Corporation | पुणे मनपा खाजगी जागेवरील लसीकरण केंद्रांचे स्थलांतर करणार ! लसीकरण केंद्रांवरील मंडप काढून टाकण्याचे आदेश

Pune Crime | ‘मार्केटिंग’वाल्या 25 वर्षीय विवाहितेला पुणे स्टेशनजवळच्या लॉजवर नेलं, कोल्ड्रींकमधून गुंगीचं औषध देऊन ‘काम’ तमाम, व्हिडीओ अन् फोटो व्हायरलची धमकी