Ajit Pawar | अजित पवारांनी पिळले तरुणाईचे कान; म्हणाले-‘उगाच हार्ट काढून त्याला बाण काढू नका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मेट्रो 2A (Mumbai Metro 2A) आणि मेट्रो 7 (Mumbai Metro 7) या मार्गिकेचे उद्घाटन झाले. शनिवारपासून सेवेला सुरुवात देखील झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संबोधित करताना तरुणाईचे कान चांगले पिळले. मेट्रोला स्वच्छ ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले. ही मेट्रो आपली आहे असे समजून ती स्वच्छ ठेवण ही आपली जबाबदारी आहे. थुंकू नका, डब्यात काही लिहू नका. उगाच हार्ट काढत त्यात बाण काढू नका. परदेशात गेल्यानंतर तेथे असे करता का ? असा प्रश्नही अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला.

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मुंबईसह महाराष्ट्रात (Maharashtra) येत्या तीन वर्षांत 4 लाख कोटींची कामे करण्यात येणार आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget) यावर्षी 1 लाख 15 हजार कोटींची तरतूद केली आहे. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम करणार आहे. सुखाचे दिवस म्हणजे नेमके काय असतं त्यात रस्ते (Road), मोनो (Mono), मेट्रो मोनो सारख्या आणि शिक्षण (Education), अन्न (Food), आरोग्याच्या (Health) सेवा मिळाल्या पाहिजेत. आणि हे देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईकरांची (Mumbai) ही पायाभूत विकासाची गुढी आहे.

 

अलीकडे महत्त्वाच्या कामापेक्षा नको त्या चर्चेला महत्त्व आल आहे.
कुठलंही सरकार असो ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कोणताही प्रकल्प सहजासहजी उभा राहत नाही.
त्यासाठी झोकून देऊन काम करावं लागतं. या मेट्रोमुळे पश्चिम उपनगरातील कोंडी सुटणार आहे असेही अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | inaugurated both mumbai metro 2a and metro 7 corridors ajit pawar speech

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा