Ajit Pawar | आयकर विभागाचा अजित पवारांना दणका ! 1000 कोटींची संपत्ती जप्त करण्याचे दिले आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात धडक कारवाया सुरु केल्या आहेत. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांना अटक केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना आयकर विभागाने मोठा दणका दिला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अजित पवारांच्या कुटुंबीयांविरोधात आर्थिक व्यवहाराबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर अजित पवारांच्या (Ajit Pawar) निगडित असणाऱ्या संपत्तीवर आयकर विभागाने धाडी (Income Tax Raids) टाकल्या होता. आता आयकर विभागाने अजित पवारांशी संबंधित असणाऱ्या सुमारे एक हजार कोटींच्या संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश दिले आहेत.

किरीट सोमय्यांनी पवार कुटुंबीयांनी बेनामी पद्धतीने संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला होता. सोमय्यांनी यांनी ट्विटरद्वारे म्हंटले होते की, जरंडेश्वर साखर कारखान्याचे (jarandeshwar sugar factory) मोहन पाटील (Mohan Patil) हे एक मालक आहेत. पवार परिवाराचे जावई आणि अन्य सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची ट्रान्सफर झाले आहेत. यासंदर्भात ‘आजतक’ या वृत्तवाहिनीने वृत्त दिलं आहे.

ट्विट मध्ये सोमय्या यांनी सांगितले की, अजित पवार Ajit Pawar (स्वत:), त्यांची पत्नी सुनेत्रा अजित पवार, मुलगा पार्थ अजित पवार, आई आशा अनंतराव पवार, बहीण विजया मोहन पाटील, जावई मोहन पाटील, बहीण नीता पाटील यांच्या बँक खात्यात ही बेनामी आवक आल्याचे व्यवहार आढळून आले आहेत. गेल्या १९ दिवसापासून आयकर विभाग (Income Tax Department) आणि ईडीचे (ED) धाड सत्र सुरु आहे. यामध्ये या यंत्रणांना सुमारे १ हजार ५० कोटींची बेनामी संपत्ती आढळून आली आहे. इतकच नाही तर १८४ कोटी रुपयांची रोकड, दागिने (ज्वेलरी), आर्थिक व्यवहारांचे कागदपत्रे आयकर विभागाच्या हाती लागले असल्याचे सोमय्या यांनी म्हंटले आहे. या घडामोडीनंतर आयकर विभागाने संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिल्याने पवारांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहेत.

खालील संपत्तीवर होणार जप्तीची कारवाई

जरंडेश्वर साखर कारखाना: अंदाजित किंमत ६०० कोटी

दक्षिण दिल्लीतील फ्लॅट: २० कोटी

पार्थ पवार निर्मल ऑफिस: २५ कोटी

निलय नावाचं गोव्यातील रिसोर्ट:२५० कोटी

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेल्या जमिनी : जवळपास ५०० कोटी

हे देखील वाचा

Kirit Somaiya | अजित पवारांचे जावई मोहन पाटील यांचे कोटीचे आर्थिक व्यवहार; किरीट सोमय्या यांचा घणाघाती आरोप

Amruta Fadnavis | तुम्ही मर्द आहात ना? मग थेट देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका – अमृता फडणवीस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Ajit Pawar | income tax department orders confiscation assets worth rs 1000 crore dcm ajit pawar family

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update