‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या बड्या नेत्यांची बैठक सुरू, अजित पवार, जयंत पाटलांसह इतर नेते उपस्थित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्रित बैठक सुरु आहे अशी माहिती समोर आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या बैठकीला दोन्ही पक्षाचे अनेक मोठे नेते उपस्थित असून नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायटेंड येथे ही बैठक सुरु आहे.

या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, नवाब मलिक, जयंत पाटील, धनंजय मुंडे तर काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित आहेत.

काही वेळापूर्वीच अजित पवार बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडले होते. काही कारणास्तव साडे सात वाजता होणारी ही बैठक होणार नाही असे समजले होते. बैठक रद्द झाल्याचं खुद्द अजित पवारांनी सांगितलं होत. इतकेच नाही तर मी बारामतीला जात आहे असे ते म्हणाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती.

दरम्यान आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायटेंड ही बैठक सुरु आहे. आता या बैठकीत नेमकी काय चर्चा होईल आणि यात कोणता निर्णय घेतला जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवसेनेला घेऊन काही चर्चा होते का हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

यावर बोलताना शरद पवार म्हणाले होते की, “अजित पवार मुंबईतच आहेत. बैठका सुरू आहेत, उद्या ते येतील. गंमतीने ते काही बोलले असतील. काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे. राजकारणात काही गोष्टींना घेऊन गुप्तता पाळायला लागते. कुठेही निघालं की पत्रकारांच्या गाड्या मागे असतात. आम्हाला जराही प्रायव्हसी मिळत नाही. त्यामुळे अजित पवारांनी गंमतीनं म्हटलं असेल की, बैठक रद्द झाली आणि मी बारामतीला जातो आहे.”

दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आमची बैठक साडेसात वाजता होणार आहे असं सांगितलं होतं. परंतु अचानक आम्हाला निरोप आला की, काही कारणास्तव ही बैठक रद्द झाली आहे. आताची बैठक उद्या होऊ शकते. आमची बैठक होणार आहे. कोणतेही तर्कवितर्क लावले जाऊ नयेत”

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like