एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल विचारलं, तर अजित पवारांनी चक्क हातच जोडले

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. शनिवारी घटस्थापनेच्या मुहर्तावर ते राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते होते. मात्र अद्यापही त्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल तर्क – वितर्क लढवले जात आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी हात जोडून याबद्दल आपल्याला काहीच माहित नसल्याचे सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार हे आज सोलापूर दौ-यावर असून पूरग्रस्त शेतक-यांच्या बांधावर जाऊन ते नुकसानीची पाहणी करणार आहेत. तत्पूर्वी खडसेंच्या पक्षप्रवेशाबद्दल त्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यावर पवारांनी चक्क हात जोडले. ज्यो गोष्टीची मला माहितीच नाही, त्याबद्दल मी तुम्हा कसे सांगणार असा प्रतिप्रश्नही त्यांनी यावेळी केला.

जळगाव जिल्ह्यातील रावेर हत्याकांड प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख रावेरमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी रावेर येथील विश्रामगृहावर खडसे आणि देशमुख यांची भेट झाली. याबाबत पुर्णपणे गुप्तता पाळण्यात आली. त्यानंतर खडसे गृहमंत्री देशमुुख यांनी एकाच गाडीने घटनास्थळावर दाखल झाले. त्यामुळे खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत तर्क- वितर्क लढवले जात आहेत.

पवारांचे यापूर्वीही हेच उत्तर
राजकारणात अनेकांचा भेटी होत असतात.त्यानुसार काहीजण मला भेटून गेले. मात्र भेट झाली म्हणजे त्यात काहीतरी असू शकते असे समजणे चुकीचे आहे.तसेच खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काहीच माहिती नाही. जेवढी माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली अशी प्रतक्रिया पवार यांनी पुण्यात दिली
होती.

मोदीवर टीका
पंतप्रधान व्हीडीओ कान्फरन्सद्वारे देशाचा कारभार चालवू शकतात. तर मग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हीडीओ कान्फरन्सद्वारे महाराष्ट्राचा कारभार चालवला तर विरोधकांनी मुख्यमंत्र्यावर का टीका करावी, अशा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.