Ajit Pawar | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक

शेतकऱ्यांच्या जीवावर राज्य चालत; शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा दुसर मोठ काही नाही – विरोधी पक्षनेते

मुंबई : Ajit Pawar | नापिकी, शेतमाल मातीमोल भावाने विकावा लागत आहे, त्यातच अवकाळी पावसाने राज्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे. राज्याच्या कृषीमंत्र्यांच्या मतदार संघात एकाच गावात दोन शेतकरी आत्महत्या करतात, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. लाखाचा पोशिंदा असणारा शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर राज्य चालत, शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा या सभागृहात दुसर मोठ काहीही नाही, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा घणाघाती आरोप करत विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक झाले. (Ajit Pawar)

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. नाफेडकडून खरेदी सुरु असल्याची माहिती सरकार सांगत आहे, मात्र फिल्डवरची स्थिती वेगळी आहे. अजूनही कांदा, हरबरा खरेदी सुरु नाही. सरकार सभागृहाची दिशाभूल करत आहे. त्यातच गेल्या चार दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या अवकाळी पावसामुळे एक लाख एकर क्षेत्र बाधित झालेले आहे. (Ajit Pawar)

कापणीला आलेले पीक वाया गेलं आहे. राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडून कोणत्याही प्रकारचा दिलासा शेतकऱ्यांना मिळत नाही. राज्याच्या कृषीमंत्र्यांच्या मतदार संघात एकाच गावातले दोन शेतकरी आत्महत्या करतात ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

Web Title : Ajit Pawar | Leader of Opposition Ajit Pawar is aggressive in the House on the issue of farmers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Crime News | इमारतीच्या छतावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या; मुंबईमधील घटना

Wardha Crime News | खळबळजनक ! पोलिस अधिकार्‍यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, प्रचंड खळबळ

Solapur Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Pravin Tarde | प्रवीण तरडे यांना ’कलाजीवन गौरव’ पुरस्कार