Ajit Pawar | थेट PM मोदींना सांगत अजित पवारांचा व्यासपीठावरुन राज्यपालांना सणसणीत टोला (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर (Pune Tour) आहेत. पुणे दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील Pune Municipal Corporation (PMC) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच पुणे मेट्रोला (Pune Metro) हिरवा कंदील दाखवून पुणे आणि पिंपरी – चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील मेट्रोचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरुन सणसणीत टोला लगावला.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, महत्वाच्या पदांवर असणारे व्यक्ती अनावश्यक वक्तव्य करत आहेत. यामुळे अनावश्यक गोष्टी घडत आहेत. राज्यातील कोणत्याही व्यक्तीला हे पटणारे नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले (Mahatma Phule) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य (Controversial Statement) करणे महाराष्ट्राला हे सहन होणार नाही. मी हे कोणताही संकूचित विचार न ठेवता बोलत आहे. पुण्याचा विकास करण्यासाठी कोणतेही राजकारण (Politics) आडवे न आणता आपल्याला काम करायचे आहे, असे अजित पवार म्हणाले.

 

अजित पवार पुढे म्हणाले, पिंपरी – स्वारगेट जसं काम सुरु आहे तसं स्वारगेट (Swargate) ते कात्रज (Katraj)… हडपसर (Hadapsar) ते खराडी (Kharadi) या दोन मार्गिकेचा अहवाल प्रकल्पाचं काम सुरु आहे.
ते काम पूर्ण करुन जसं आताच्या मेट्रोमध्ये 50 टक्के राज्य आणि 50 टक्के केंद्राची आहे.
10 टक्के मनपाची आहे. त्याच धर्तीवर मेट्रो सुरु करण्यासाठी मदत आपण केली. तशीच मदत आम्हाला करावी.
आपल्यामुळे गडकरीसाहेबांमुळे (Nitin Gadkari) नागपूर, मुंबई पुणे, नाशिक मेट्रो दोनसाठी मदत झाली पाहिजे.
विकासाचा वेग वाढवण्यासाठी आपले सहकार्य मिळावं. यात कोणतेही राजकारण न आणता सगळ्यांनी एकजुटीने काम करावं,
असे अजित पवार म्हणाले.

 

पुण्यातील मुख्य नद्या असणाऱ्या मुळा आणि मुठा नद्या सुशोभिकरण होणे गरजेचे आहे.
नदी पात्रातील पाण्याचे स्त्रोत पर्यावरणाला कोणताही धोका न होता याचे काम करावे लागेल.
पुण्यातील नद्यांना पूर नियंत्रण रेषेचा विचार करुन नद्यांचे नुतनीकरण व्हावे असेही अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | maharashtra deputy chief minister ajit pawar on governor bhagatsingh koshyari pm narendra modi visit to pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा