Ajit Pawar | ‘संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते, पण बंद करायला नाही’ – अजित पवार

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – सहकार समृद्धी पॅनेलच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil), सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपचे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जोरदार टीका केली. शिवराम भाऊ, डी.बी ढोलम (D.B. Dholam) यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. सहकारात पक्षीय राजकारण असता कामा नये. बँक ही प्रत्येक जिल्ह्याची आर्थिक नाडी असते, असे पवार यांनी सांगितले.

 

अजित पवार पुढे म्हणाले, ज्यांच्या नेतृत्वाखालील बँकेत सतीश सावंत (Satish Sawant) काम करत होते ते काय काय काम सांगत होते हे जिल्ह्याला माहित आहे. संस्था उभ्या करायला डोके आणि अक्कल लागते, पण बंद करायलाय अक्कल लागत नाही, असा टोला अजित पवार (Ajit Pawar) यांनी नारायण राणे यांना लगावला. खासदार (MP), आमदार (MLA) होणे सोपे पण बँकेची निवडणूक (Bank Election) लढवणे अवघड आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sindhudurg District Bank) राज्यात अग्रेसर असून याठिकाणी स्पर्धा मोठी असल्याचे पवार यांनी सांगितले.

 

विरोधकांचे राजकीय पाठबळ कसे आहे ते पहा. दादागिरी दहशतीला घाबरु नका, असे म्हणत त्यांनी नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. कर्ज कसे थकवले हे सभासदांनी बघावे. बँकेत चुकीचे वागून चालणार नाही. परंतु निवडणुकीत गाफिल राहू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले. योग्य व्यक्तीच्या हातात बँक द्या. अन्यथा उस्मानाबाद, नांदेड, बीड सारखी अवस्था सिंधुदुर्ग बँकेची होईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

कोणत्याही परिस्थितीत बँक जिंकायची
केंद्र सरकारची (Central Government) राज्यातील सहकार खात्यावर वक्रदृष्टी आहे.
शरद पवार यांचा आदर्श घेऊन सहकारमध्ये काम केले पाहिजे, असं मत विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी व्यक्त केले.
कुठल्याही परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिकायची आहे. बँकेवर महाविकास आघाडीचेच पॅनेल येईल असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

 

Web Title :- Ajit Pawar | maharashtra deputy cm ajit pawar slams bjp Narayan Rane over co operative banks election sindhudurga

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Former MLA Mohan Joshi | लसीकरण, निर्बंधांच्या पालनासाठी कॉंग्रेस पुण्यात सक्रीय राहील – माजी आमदार मोहन जोशी

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी पायी तिरुपतीला जाणाऱ्या बीडच्या शिवसैनिकाचा वाटेत मृत्यू

Phone Tapping Case | फोन टॅपिंग प्रकरण! देवेंद्र फडणवीसच मुख्य साक्षीदार; राज्य सरकारचा न्यायालयात दावा