Ajit Pawar | राज्यात ‘कोरोना’च्या रुग्ण संख्येत वाढ ! अजित पवार म्हणाले – ‘सरकारला काही निर्बंध लागू करण्यासंदर्भात विचार करावा लागेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा (Corona in Maharashtra) प्रादुर्भाव कमी झाल्याने कोरोना निर्बंध (Corona Restrictions) शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, आता राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी इशारा दिला आहे.  कोविड-19 प्रकरणे वाढत राहिल्यास, सरकारला निर्बंधाबाबत पुन्हा विचार करावा लागेल, असा इशारा अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे.

 

कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत राहिली तर राज्य सरकारला (Maharashtra State Government) काही मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) लागू करण्यावर लक्ष ठेवावे लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि मंत्रिमंडळाशी पुरेशा सल्लामसलत केल्यानंतरच मार्गदर्शक तत्त्वांमध्ये किंवा नवीन निर्बंधांमध्ये कोणताही बदल करण्याचा विचार केला जाईल, असेही अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

दुसरीकडे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी जालन्यात पत्रकारांशी संवाद साधताना,
बीजिंग आणि शांघाय सारख्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये नवीन निर्बध लागू करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
याठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लोकांना घरीच राहण्याचा इशारा दिल्याचे टोपे यांनी सांगितले.
टोपे म्हणाले, मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघरमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे.
मात्र, परिस्थिती चिंताजनक नाही नसल्याचे सांगत त्यांनी सर्वांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | maharashtra govt will have to reconsider imposing some guidelines says ajit pawar on covid increase in state

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC Q4 Results | एलआयसीच्या नफ्यात झाली घसरण, गुंतवणुकदारांना मिळेल इतका लाभांश

 

HotStock Alerts | सीधा सौदा : असे स्टॉक्स ज्यामध्ये ट्रेड घेऊन तुम्ही करू शकता दमदार कमाई

 

Rupali Chakankar | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी