Ajit Pawar | …तोपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पीएम मोदींना मराठीत पत्र

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  बेळगाव (Belgaum) सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक (Karnataka) सरकारकडून वारंवार अन्याय होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना याबाबत लिखित पत्र पाठवले आहे. सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पुढाकार घ्या, याबाबत विनंती अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्राच्या माध्यमातून केली आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात असं लिहिलं आहे की,
‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन होऊन 60 हून जास्त वर्षे झाली तरीही, बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील (Maharashtra-Karnataka border)
शेकडो मराठी भाषिक गावं अजूनही महाराष्ट्राबाहेर आहेत.
संयुक्त महाराष्ट्र हे प्रत्येक महाराष्ट्रवासीयाचे स्वप्न आहे.
हा महाराष्ट्र सरकार व जनतेचा दृढ निर्धार आहे. तो पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही.
विधायक मार्गाने न्यायासाठीचा लढा सुरू राहणार आहे, असं त्या पत्रातून सांगितलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक खात्री व्यक्त करत पंतप्रधान मोदींना पत्र पाठवले आहे.
सीमाप्रश्नाची लढाई ही महाराष्ट्राच्या वतीनं जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायोचित असल्यानं दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल, असं त्या पत्रात म्हटलं आहे.
महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्यानं मी सीमाभागातील मराठी बांधवांच्या मागणीला पाठिंबा देत आहे.
आपण मराठी भाषिक बांधवांची मागणी मान्य करावी, अशी पत्राद्वारे विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.

 

Web Title : Ajit Pawar | maharashtra karnataka border issue ajit pawar writes pm narendra modi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kolhapur Crime | आजी रागावल्याचा राग मनात धरून 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या

Weight Loss Tips | ‘या’ सवयी बदला, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल; जाणून घ्या

Desi Ghee | जाणून घ्या देसी तूप कोलेस्ट्रॉलसाठी चांगले आहे की वाईट?