Ajit Pawar | इंधन दर कपातीवरुन अजित पवारांकडून राज्य सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘आमच्याकडे 50 % करकपातीची मागणी करत होता, आता…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारने (State Government) आज पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात (Petrol-Diesel Price Reduction) केल्याची मोठी घोषणा केली. सरकारने हा निर्णय घेत सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी इंधन दरकपातीवरुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde)-भाजप सरकारवर (BJP Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकारकडे (Mahavikas Aghadi Government) 50 टक्के करकपातीची मागणी करत होता. आता सत्तेत आल्यानंतर तुटपुंजी कपात का केली? असा सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला आहे. ते पुण्यात बोलत होते.

 

पेट्रोल आणि डिझेलवरील काही प्रमाणात टँक्स कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी अडीच वर्ष अर्थमंत्री (Finance Minister) राहिलोय. मागील अर्थसंकल्पात गॅसच्या किंमती (Gas Price) प्रचंड प्रमाणात कमी केल्या होत्या. साडेतेरा टक्केंचा टॅक्स तीन टक्क्यांवर आणला होता. त्यामुळे हजार कोटींचा भार राज्य सरकारने उचलला होता. त्यावेळी विरोधी पक्षात असणारे हे लोक मागणी करत होते की, राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलला जितका टॅक्स लावते, ते 50 टक्के करा. विरोधात असताना मागणी करत होते, आता सत्तेत आल्यानंतर त्यांनी 50 टक्के टॅक्स कमी का नाही केला? जर 50 टक्के कर कपात केली असती तर डिझेलची किंमत 11 रुपये आणि पेट्रोल 17 रुपयांनी कमी झाली असती. मात्र त्यांनी तसे केले नाही. विरोधात असताना मागणी करायची अन् निर्णय घेण्याची वेळ आल्यावर पळवाट काढायची, अशी टीका अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

अजित पवार पुढे म्हणाले, आज तीन आणि पाच रुपयांनी किंमत कमी केली आहे.
पण पुढील काही दिवसांत केंद्र सरकार (Central Government) पेट्रोल आणि डिझेल सातत्याने वाढवतेच.
गॅस सिलिंडर (Gas Cylinder) वाढवतेच. त्यामुळे सर्वसामान्यांना झळ बसत आहे.
आपण इतका टॅक्स कमी करुन देखील सीएनजीचा वापर करणारे ऑटो रिक्षावाले, टॅक्सीवाले,
चारचाकी सगळे भेटतात अन् म्हणतात की, एकीकडे तुम्ही टॅक्स कमी करता अन् दुसरीकडे केंद्र सरकार वाढवते,
आम्हाला काहीच फायदा होत नाही. पूर्वीचं बरं म्हणण्याची वेळ आली आहे,अशा प्रकारचं चित्र आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | maharashtra legislative assembly lop ajit pawar critisize to cm eknath shinde and dcm devendra fadnvis over to decresing petrol diesel rate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SBI ने ग्राहकांना दिला झटका, MCLR वाढला; कर्ज घेणे होणार महाग, नवीन आणि जुन्या ग्राहकांना फटका

 

Pune PMC News | पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व मनपा व खासगी शाळा उद्यापासून (दि.15) नियमित सुरू

 

Jayant Patil | ‘दीपक केसरकर खरे शिवसैनिक नाहीत, सिंधुदुर्गचे समुद्रकिनारे दाखवण्यासाठी..’ – जयंत पाटील