Ajit Pawar | ‘मी आता वहिनींनाच सांगणार आहे की…’ फडणवीसांकडे पाहून अजित पवारांची फटकेबाजी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार तसेच राज्याबाहेर गेलेले उद्योग यावर आज (मंगळवारी) विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच सुनावले. त्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणात मुख्यत्वे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना चिमटे काढले. तसेच भरत गोगावले (Bharat Gogawale), गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची नावे घेत विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. (Ajit Pawar)

 

वहिनींना सांगणार आहे जरा…
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ‘एकट्या देवेंद्रजींकडे सहा खाती आहेत. त्यात अजून तुमच्या खात्यांचा भार त्यांच्यावर कशाला टाकता? सहा पालकमंत्रीपदं (Guardian Minister) त्यांच्याकडे आहेत. ते कर्तृत्ववान आहेत, पण त्यांनी 6 पालकमंत्री वेगळे नेमले तर काम जास्त होणार नाही? भाजपलाही (BJP) महिलांची मते मिळाली. तरी त्यांना सहा महिन्यात एकही महिला सापडेना मंत्री करायला? हा कुठला कारभार आहे? मी आता येवून वहिनींनाच सांगणार आहे, जरा बघा यांच्याकडे रात्री. त्यांनी मनावर घेतल तर लगेच एखादी महिला मंत्री होईल. मला याची खात्री आहे.’ असा टोला त्यांनी यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

 

तुम्हाला तळतळाट लागेल
तसेच अजित पवारांनी यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांना उद्देशून देखील विधान केले. ते म्हणाले, ‘देवेंद्रजींना विचारले की ते म्हणतात मुख्यमंत्र्यांची संमती आणा, मुख्यमंत्र्यांना विचारले की ते म्हणतात देवेंद्रजींनी सांगितलं की मी केलं, नुसती टोलवाटोलवी सुरू आहे. दादांची मला इतकी आठवण येते. तुमच्यासारखी व्यक्ती असती तर अशी टोलवाटोलवी झाली नसती. आमचा कोल्हापूरचा ढाण्या वाघ, पण त्यांना एक दोन साधी खाती दिली आहेत आणि बाजूला ठेवलं आहे आणि स्वतः सहा सहा महत्वाची खाती घेतली आहेत. या पद्धतीचे राजकारण करता? हे बरोबर नाही. तुम्हाला या लोकांचा तळतळाट लागेल.’

त्यामुळे त्यांना तिथे पाठवायचं ठरलं
गिरीष महाजनांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, उत्तर महाराष्ट्राला अजून मुख्यमंत्रीपद मिळालं नाही हे दुर्दैव आहे. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याला मिळालं, पण धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकला मिळालं नाही. गिरीश महाजनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भाजप वाढवायला पाठवायचं आहे. युनायटेड नेशन (United Nations), त्यांचे कॉन्टॅक्ट फार आहेत. ते इतके झटपट कॉन्टॅक्ट करतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे त्यांना तिथे पाठवायचं ठरलं आहे’, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली.

 

सूट शिवून आणलेला कधी घालायचा?
भरत गोगावले साहेब आपण सूट शिवून आणलेला कधी घालायचा? मी राज्यपालांना (Governor) सांगून ठेवले आहे. गोगावले साहेबांचा शपथविधी असेल तर दुनियेत कुठेही असेन तरी शपथविधीला जाणार. खूप जणांचे सूट वाया चालले आहेत. उंदीर लागेल त्याला, त्यांच्या घरातली माणसं सूट कशाला शिवले विचारत आहेत. लग्नात घातला नाही, आताही घालत नाही. जरा लक्ष द्या. असा टोला त्यांनी रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना आमदार भरत गोगावले यांना लगावला.

 

Web Title :- Ajit Pawar | maharashtra winter session ajit pawar speech in vidhan sabha says will meet amruta fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | अजित पवारांचा बावनकुळेंना इशारा, म्हणाले-‘ठरवलं ना तर कोणाच्या बापाला घाबरत नाही, करेक्ट कार्यक्रम करेल’

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, वसंत मोरेंची नाराजी दूर होणार?

Uddhav Thackeray | कर्नाटक विरोधात विधीमंडळात एकमताने ठराव मंजुर होताच समोर आली उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…