Ajit Pawar | अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिला सल्ला; म्हणाले – ‘सरकार तुमचंच आहे पण त्याला लुटू नका’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | बारामतीतील (Baramati) माळेगाव राजहंस संकुल संस्थेच्या नवीन इमारत उद्घाटनाच्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. रस्ता रुंदीकरणाच्या मुद्यावरुन बोलत असताना अजित पवारांनी यावेळी त्यांच्या खास शेलीत शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. ‘सरकार तुमचंच आहे पण सरकारला लुटू नका,’ असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे.

 

त्यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ‘रस्ता रुंदीकरणामध्ये शेतकऱ्यांनी रस्त्याच्या बाजूला झाडे लावली आहेत. जो जमिनीचा भाग रस्ता रुंदीकरणात जाणार आहे त्याच ठिकाणी लोकांनी झाडं लावली आहेत. दुसऱ्या बाजूला झाडे लावलेली नाहीत. मी प्रांतधिकारी यांना विचारलं तर त्यांनी आंबा, नारळ याची झाडं लावली की जास्त पैसे मिळतात. त्यामुळे लोकं अशी झाडं लावतात,’ असं अजित पवार यांनी सांगितलं.

पुढे अजित पवार म्हणाले, ‘सरकार तुमचेच आहे पण सरकारला लुटू नका. जेवढे नियमाने पाहिजे तेवढे घ्या. झाड, विहीर असेल तर त्याचा मोबदला घ्या पण अशा पद्धतीने झाडे लावून मोबदला घेणे बरोबर नाही. आम्ही जाताना कुणाचे काय सुरु आहे हे बघत असतो. शेवटी हा जनतेचा पैसा आहे. सरकार कुठे नोटा छापत नाही. कराच्या रुपातून आलेल्या पैशातूनच ही सर्व कामे केली जातात. त्याची जाणीव आपण ठेवावी.

 

Web Title :- Ajit Pawar | Mahavikas Aghadi government is yours but dont rob it ajit pawar gives advice to farmers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Modi Government | साखर निर्यातीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या शेतकर्‍यांवर काय होणार परिणाम

OBC Reservation Maharashtra | राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! OBC संवर्गातील 400 जागांवरील निवडणुका स्थगित

Multibagger Penny Stock | रू. 19 चा स्टॉक वाढून रू. 494 चा झाला, 6 महिन्यात गुंतवणुकदार झाले मालामाल; तुमच्याकडे आहे का?

Covid Jab | बिहारमध्ये PM मोदी-सोनिया-प्रियंकाने घेतला कोरोनाचा डोस! आरोग्य विभागाचा अजब खेळ

Pune Crime | 27 वर्षीय IT इंजिनिअर प्रियकरानं 29 वर्षीय संगणक अभियंता प्रेयसीला घातली ‘गळ’, म्हणाला – ‘आपण लग्न करणार आहोत, तू तुझा न्युड व्हिडीओ पाठवं’, Video सेंड केल्यानंतर घडलं भलतच ‘कांड’

Anti Corruption Bureau Pune | 50 हजाराचे लाच प्रकरण ! पुणे अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकानं बारामती सेशन कोर्टातील पोलिसाला घेतलं ताब्यात