Ajit Pawar | नाना पटोले यांनी सोनिया गांधी यांच्याकडे केलेल्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले – ‘कुटुंबात भांड्याला भांड लागतच असतं….’

कराड : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अडीच वर्षांपूर्वी ज्या मुद्द्यांवरून सरकार बनलं होत त्याच उल्लंघन करत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) भाजपला (BJP) मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर कराडमधील पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. ‘कुटुंबात असताना भांड्याला भांडं लागत असतं. तक्रार करण्याची आपली परंपराच असल्याचे,’ त्यांनी म्हंटले आहे.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ”तक्रार करण्याची परंपराच आहे. नाना पटोलेंनी त्यांच्या नेत्यांना काय सांगावे हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्या पक्ष श्रेष्ठींकडे आम्हीही तक्रार करत असतो. शेवटी काय कुटुंबात असताना भांड्याला भांडं लागत असतच. आणि इथं तर 3 कुटुंब आहेत. मग भांड्याला भांडं लागणारच. पण सरकार नीट चालवण्यासाठी आम्ही प्रयत्न नक्कीच करू. तेच आम्हा सर्वांचं उद्दिष्ट आहे. प्रत्येक पक्षाची ध्येय, विचार वेगवेगळी असतात. काय करावं आणि काय करू नये हे ज्या-त्या पक्षाचा अधिकार असतो. देशात 24 पक्षांच्या एनडीएचं सरकार आपण पाहिलं आहे. यात हेवेदावे आणि वाद होतच असतात,” असेही ते म्हणाले.

”आरोप प्रत्यारोपांची महाराष्ट्राची परंपरा नाही. सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माझं एकच सांगणं आहे. देश आणि राज्यासाठी जे विषय महत्त्वाचे आहेत त्यालाच प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. त्यासाठी आरोप प्रत्यारोप न करता सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. लोकांसाठी काम केलं पाहिजे. मला कोणी काय आरोप केले आहे याबद्दल विचारण्यापेक्षा विकासाबद्दल, पावसाळ्या बाबत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आणि चालू समस्यांबद्दल विचारा,” असेही ते म्हणाले.

Web Title : Ajit Pawar | nana patole complaint of ncp to sonia gandhi ajit pawar says this is tradition

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

 

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

 

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

 

Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते

 

Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी