Ajit Pawar | ‘पूर्वी आम्ही घास घास घासायचो, इकडे आलो तर…’, अजित पवारांची तुफान फटकेबाजी

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीत (Pune Lok Sabha Election) हाय व्होल्टेज लढत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा तर महायुतीकडून (Mahayuti) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर आता सभांचा धडाका लागला आहे. बारामती मतदारसंघात (Baramati Lok Sabha) नणंद विरुद्ध भावजय अशी थेट लढत होत असून पवार विरुद्ध सुळे असा संघर्ष रंगला आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.(Ajit Pawar)

शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्राकार परिषदेत बाहेरून आलेले पवार आणि मूळ पवार यांच्यात फरक असल्याचे म्हटले होते. यावरुन पवार घराण्याच्या सून आणि उमेदवार सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले होते. तर काही जण लेक आणि सुनेत फरक करत असल्याचे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले होते. आता पुन्हा एकदा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना पवार कुटुंबात रंगल्याचे पाहायला मिळत आहे. बारामती येथील सभेत अजित पवारांनी सगळंच काढलं. पुतण्या, काका, काकीसह पवार कुटुंबातील सर्वच विरोधकांवर हल्लाबोल केला. सगळं काही साहेबांनी केलं, माग गेल्या 30-35 वर्षात आम्ही काय केलं, असा प्रश्न अजित पवारांनी जाहीर सभेत केला आहे.

अजित पवारांनी ‘पवार’ कुटुंबाचा 7/12 च काढला

अजित पवार यांनी बारातमतीच्या भाषणात पवार कुटुंबाचा सात-बारा काढला. यामध्ये पद्मश्री आप्पासाहेब पवार यांच्यापासून पिढ्यान पिढ्यांचा इतिहास काढला. विद्या प्रतिष्ठान संस्थेचा दाखला देत युगेंद्र पवारांनी केलेल्या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले. विद्या प्रतिष्ठान संस्था वाढवण्यात आम्ही पुढाकार घेतला, जमिन, इमारती याचा उल्लेख करत आमचे चिरंजीव म्हणतात हे सगळं साहेबांनी केलं, साहेबांचे आशीर्वाद होते पण तुम्ही सगळं चुकीचं का सांगता असा सवाल अजित पवारांनी विचारला.

तेव्हा शरद पवार नाराज झाले होते

अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये बारामती तालुक्यातील विकासकामांचा इतिहास आणि कौटुंबीक राजकीय जडणघडणीवर भाष्य केलं.
यावेळी सुप्रिया सुळे यांच्या लग्नापासून ते स्वत:च्या लग्नापर्यंत सगळं सांगितलं. तसेच शरद पवार तेव्हा नाराज झाले होते.
राजकारण सोडून काटेवाडीला जातो, असेही म्हणाले होते, असा दाखला देत मी राजकारणात कसा आलो,
हे देखील अजित पवारांनी सांगितले.

आम्ही घास घास घासायचं

अजित पवार पुढे म्हणाले, मी म्हटलं की, मुलाला निवडून दिले, लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या, तेव्हा काहींना वाईट वाटलं. मी देवेंद्र फडणवीस, एकनाथजी दिल्लीला जातो. आम्ही इकडं गेल्यामुळे आमची मोदींजींसोबत ओळख झाली. आमच्या अदानी-अंबानींच्या ओळखी झाल्या. यापूर्वी आमच्या ओळखी नसायच्या. आम्ही घास घास घासायचं, पण मोठी लोकं यायची अन् ह्यांनी केलं, ह्यांनी केलं असं व्हायचं आणि ते निघून जायचे, असे म्हणत अजित पवारांनी केलेल्या कामाचं श्रेय वरिष्ठांना मिळायचं, आम्हाला नाही, असे म्हटले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरातच सुरू होता वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेकडून परदेशी महिलेची सुटका

Sanjay Kakade | संजय काकडेंची नाराजी दूर करण्याचे भाजपाचे प्रयत्न, आशिष शेलारांनी घेतली भेट

Pune Rape Case | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; चिराग मुकेश निहलानी वर गुन्हा दाखल