Ajit Pawar | ‘थांबा, तुम्ही 40 आमदार कुठं जाणार नाहीत, ते वरचे 10 असे तसेच’ अजित पवारांची सभागृहात फटकेबाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन होऊन जवळपास दीड महिना उलटला आहे. हे सरकार स्थापन होण्यापूर्वी शिवसेनेत (Shivsena) झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटाकडून माध्यमांसमोर भूमिका मांडणाऱ्या काही प्रमुख नेत्यांमध्ये अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा समावेश होता. अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर वाद निर्माण झाल. टीईटी घोटाळ्याच्या (TET Scam) संदर्भात त्यांचं नाव आल्याने त्यांच्यावर टीका केली जात होती. अब्दुल सत्तार यांना खातेवाटपात कृषीमंत्री पद (Agriculture Ministe) देण्यात आले. यावरुन चर्चा रंगली असातना विधानससभा विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील सत्तारांना कृषीमंत्रीपद दिल्यावरुन आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत तुफान फटकेबाजी केली.

 

राज्यातील शेतीच्या (Agriculture) झालेल्या नुकसानावर बोलताना अजित पवारांनी (Ajit Pawar) अब्दुल सत्तार यांच्याकडे गेलेल्या कृषीमंत्री पदावरून खोचक टोला लगावला. अब्दुल सत्तार, तुमच्याकडे कृषी मंत्रालय आलंय. त्यामुळे मी तर आश्चर्यचकित झालो. दादा भुसे (Dada Bhuse) फार बारकाईने बघत होते. का त्यांच्यावर अन्याय केला गेला मला माहिती नाही. मी तेव्हा बघायचो की दादा भुसे खरंच काम चांगलं करत होते. जे चांगलंय, त्याला मी चांगलंच म्हणालो असे अजित पवार म्हणाले.

ते वरचे 10 आमदार असेतसेच
अजित पवार अतिवृष्टीवर भाषण करताना समोरच्या बाकावरुन शिंदे गटातील (Shinde Group) काही आमदार (MLA) बसून बोलत होते.
यावरुन अजित पवारांनी त्यांना देखील आपल्या शैलीत टोला लगावला. ‘थांबा, तुम्ही 40 आमदार कुठ जाणार नाहीत.
तुमचीच काम करणार आहेत. जरा गप्प बसा. एक दिवस तरी विरोधी पक्षाचं ऐकून घ्या.
तुमच्यासाठी तर तिकडे खास वेगळं ऑफिसच उघडले आहे. काळजीच करु नका.
तुम्हाला 40 लोकांना तर फार सांभाळायचं आहे’,असं म्हणताच सभागृहात हशा पिकला.
यावर विरोधी बाकांवरुन ते ’40 नसून 50 आमदार असल्याचा उल्लेख करताच, नाही 40. ते वरचे 10 असेतसेच आहेत’, असे म्हणताच सभागृहात पुन्हा हशा पिकला.

 

Web Title :- Ajit Pawar | NCP ajit pawar mocks maharashtra minister abdul sattar on agriculture ministry on monsoon session

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 Ajit Pawar | शिंदे सरकारवर नामुष्की? मंत्री अजित पवारांच्या प्रश्नाला उत्तर देण्यात असमर्थ

 

Maharashtra Monsoon Season | अजित पवारांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री ‘क्लीन बोल्ड’, सरकारची नामुष्की

 

Pune Crime | कारागृहातून सुटलेल्या आरोपीने कारागृहातील महिला रक्षकालाच घातला गंडा