Ajit Pawar | ‘राज ठाकरेंचा आरोप धादांत बिनबुडाचा, माणसाने एवढे दुटप्पी वागू नये’ – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात जातींच्या चष्म्यातून सर्व काही पाहण्याचे पेव आले आहे आणि या सर्वाची सुरुवात 1999 सालापासून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून झाली, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते. त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांना विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिले आहे. महाराष्ट्र शरद पवारांना गेली 55 वर्षे ओळखत आहे. त्यांनी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार डोळ्यांसमोर ठेवला, त्यामुळे ठाकरेंचा आरोप हस्यास्पद आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

शरद पवारांना महाराष्ट्र गेली 55 वर्षे ओळखतो. शरद पवार गेली 55 वर्षे राजकारण करत आहेत. त्यांनी नेहमीच शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार डोळ्यांसमोर ठेवला. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचे काम शरद पवारांनी मागील 55 वर्षांत केले. वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणे म्हणजे हस्यास्पद गोष्ट आहे. त्यात नखभरही तथ्य नाही. राज ठाकरेंचा आरोप धादांत बिनबुडाचा आहे. शरद पवारांचे नाव घेतले तर ती बातमी होते आणि आपल्याला प्रसिद्धी मिळते. त्याचमुळे त्यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केले आहेत. राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणे, योग्य नाही. हेच राज ठाकरे शरद पवारांची मुलाखत घेत होते, तेव्हा त्यांच्याबद्दल काय काय बोलत होते? एवढे दुटप्पी माणसाने वागू नये, असे अजित पवार (Ajit Pawar) यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील राज ठाकरेंना उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचा जन्म 1999 साली झाला. 2003 साली जेम्स लेन याने ‘हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ हे घाणेरडे पुस्तक लिहिले.
त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी जेम्स लेन याला माहिती पुरवली होती.
त्या पुस्तकामध्ये माँसाहेब यांच्या चारित्र्याबद्दल आणि शहाजीराजांच्या पितृत्वाबद्दल शंका घेण्यात आली आहे.
या पुस्तकाबद्दल सगळ्यात पहिले आक्षेप घेणारा मी आणि सीपीआयचा कार्यकर्ता किशोर ढमाले हेच होतो.
नंतर हा मुद्दा पेटला आणि अनेकांनी यात उड्या घेतल्या, त्यावेळी ठाकरे पुरंदरेंची बाजू घेऊन बोलत होते
आणि आजही कौतुक करतात. त्यामुळे जातीवादी राष्ट्रवादी काँग्रेस, की राज ठाकरे हे तुम्ही पाहा,
असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

Web Title :- Ajit Pawar | ncp ajit pawar mocks mns raj thackeray on sharad pawar cast politics in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत महिलेचा केला विनयभंग

Crime News | ज्वेलरी शाॅपमध्ये चोरट्यांचा गोळीबार; सोने आणि रोख रक्कम हिसकावून पसार