Ajit Pawar | ‘आशिष शेलारांच्या मताशी मी सहमत, त्यांना समज दिली पाहिजे’, संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) बुधवारी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना विधिमंडळ हे चोर मंडळ असल्याचे वादग्रस्त विधान केले. राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदे गट (Shinde Group) – भाजप (BJP) आक्रमक झाली असताना भाजप आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी हा महाराष्ट्राचा अपमान आहे, हा महाराष्ट्रद्रोह असल्याचे सांगितले. तर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आशिष शेलार यांच्या मताशी मी सहमत असून हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे सांगितले. मात्र संजय राऊत खरोखरच बोलले का? हे देखील तपासण्याची गरज असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

काय म्हणाले आशिष शेलार

आशिष शेलार म्हणाले, संजय राऊतांनी विधिमंडळाला चोर मंडळ म्हटलं आहे. विधिमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार त्यांना कोणी दिली. एखाद्याचा राजकीय अभिनिवेश काहीही असू शकतो. राजकारणात आपण एकमेकांच्या विरोधात असू शकतो. मात्र या विधिमंडळाच्या अभिमान सभागृहातील सर्वच सदस्यांना आहे. विधिमंडळाला चोर म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा महाराष्ट्रद्रोह आहे.

आशिष शेलार यांच्या मताशी सहमत

आपण सर्व विधिमंडळाचे सदस्य आहोत. कोणी कोणत्याही पक्षातून निवडून येऊ द्या.
आपण पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. कोणत्याही नेत्याला व्यक्तीला चोर मंडळ म्हणण्याचा अधिकार नाही.
मी काही वेळापूर्वी यासंदर्भातील बातमी टीव्हीवर पाहिली. खरं तर आशिष शेलार यांच्या मताशी मी सहमत आहे.
राजकीय मतभेद बाजुला ठेऊन हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे.
मात्र, संजय राऊत खरोखरच बोलले का?हे देखील पाहण्याची गरज आहे. ती व्यक्ती तशी बोलली असेल तर कोणत्याही पक्षाची असो कोणत्याही पदावरील असो त्यांना समज दिली पाहिजे असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

Web Title :-  Ajit Pawar | ncp ajit pawar support bjp ashish shelar over thackeray group mp sanjay raut statement about vidhan sabha

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nana Patole | ‘विधीमंडळाचाच नाही तर जनतेचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही’ – नाना पटोले

Pune Kasba Peth Bypoll Election Results | कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण

MP Sanjay Raut | संजय राऊत हक्कभंग प्रकरणी दोन दिवसांत चौकशी, 8 मार्चला निर्णय; राहुल नार्वेकरांची माहिती