Ajit Pawar | डॉक्टर शनिवारी रजेवरच असतात, बारामतीकरांच्या तक्रारीनंतर अजित पवारांची सरप्राईज व्हिजीट; डॉक्टर आला ‘गोत्यात’

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – बारामतीच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर दर शनिवारी अनधिकृत सुट्टी घेतात. म्हणजे भरपगारी खाडा करतात, अशी तक्रार विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे आली होती. त्यानुसार त्यांनी शनिवारी कोणालाही कसलीही माहिती न देता रुग्णालयाला आकस्मित भेट (Surprise Visit) दिली. आणि अजित पवारांना (Ajit Pawar) पाहुन सर्वांची पळापळ झाली.

अजित पवारांनी (Ajit Pawar) कोणतीही पूर्वसूचना न देता सरळ तक्रारीची शहानिशा करण्यासाठी भेट दिली त्यावेळी महविद्यालयाचे अधिष्ठाता देखील तेथे हजर नव्हते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या फोनवरुन अधिष्ठातांना फोन केला आणि आज सुट्टी आहे का विचारले. त्यावर त्यांनी नाही म्हणून उत्तर दिले. मग अजित पवारांना एकेकाची चांगली खरटपट्टी काढली. सुट्टी नसताना एकही डॉक्टर कामावर हजर नाही हे पाहून अजित पवार नाराज झाले. तसेच त्यांना प्रचंड संताप देखील आला होता. कोट्यवधींचा खर्च करुन इतक्या प्रशस्त इमारती उभ्या करुनही रुग्णांना सेवा मिळत नसेल, तर याला काही अर्थ नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.

डॉक्टर आणि अन्य कर्मचारी देखील त्या दिवशी रजेवर होते. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय झाली होती.
त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
तसेच यापुढे मी स्वत: येऊन सर्वांची दखल घेणार आहे, असे देखील पवारांनी यावेळी सांगितले.
त्यांनी सर्वांना स्वच्छ आणि कडक शब्दांत तंबी दिली आणि निलंबनाची कारवाई करण्यास देखील मागे पुढे
पाहणार नाही, असे सर्वांना सांगितले. तसेच यावेळी त्यांनी शनिवारी रजेवर असलेल्या डॉक्टरांपासून सर्वांची
सविस्तर माहिती देण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनाला दिले.

Web Title :- Ajit Pawar | ncp ajit pawar visit baramati government hospital