Ajit Pawar NCP – Devendra Fadnavis BJP | पुण्यातील दोन जागांवर अजित पवार गट आणि भाजपात जुंपली; निर्णयाकडे लक्ष

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar NCP – Devendra Fadnavis BJP | लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) अजित पवारांच्या पारड्यात म्हणावे असे यश पडले नाही. अजित पवारांच्या गटाचा एकच खासदार निवडून आला. मात्र केंद्रात मंत्रिपद मिळू शकले नाही. अजित पवार आणि भाजपा सुप्त वाद असल्याचे अनेकदा दिसून आले. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) अजित पवारांना आपल्या पक्षाबरोबर घेतल्याने भाजपाला खडेबोल सुनावले आहेत.

आता अजित पवारांना विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly election) आपली ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विधानसभेच्या जागेबाबत अनेकदा वक्तव्य केले त्यावरून भाजपा नेते आणि भुजबळ यांच्यातही आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. दरम्यान आता अजित पवार गटाकडून दोन जागांवर दावा करण्यात आला आहे.(Ajit Pawar NCP – Devendra Fadnavis BJP)

अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी चिंचवड विधानसभा (Chinchwad Assembly) आणि भोसरी विधानसभेवर (Bhosari Assembly) दावा केल्यानंतर या मतदारसंघात भाजपची मोठी ताकद आहे. तिथे भाजपचे आमदार आहेत, त्यामुळे या ठिकाणी भाजपचेच उमेदवार असतील असे प्रत्युत्तर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) यांनी दिले आहे. यावरुन आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांच्यात जुंपल्याचे पहायला मिळत आहे.

चिंचवड विधानसभेची तयारी करत असल्याचे देखील शंकर जगताप यांनी म्हटले आहे. शंकर जगताप यांच्या वहिनी अश्विनी लक्ष्मण जगताप सध्या चिंचवडच्या विद्यमान आमदार आहेत. त्यातच आता अजित पवार गटाकडूनही असा दावा करण्यात आल्याने आगामी काळात या मतदारसंघात काय परिस्थिती असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीतही महायुतीत आपापल्या पक्षाने उमेदवारी अर्ज भरल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र शेवटी अर्ज माघार घेण्यात आले. आता राष्ट्रवादीने दावा केलेल्या दोन जागा कोणाच्या पारड्यात जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मागच्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात अजित पवारांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभेच्या रणधुमाळीत काय परिस्थिती निर्माण होईल त्याबाबत आज अंदाज बांधता येणार नाही. मात्र या दोन जागांचा प्रश्न सोडवताना दोन्ही पक्षांना महायुतीचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

TRAI On Alternate Mobile Number | एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरल्यास होईल अडचण, ग्राहकांच्या खिशावर पडणार भार, सरकार वसुल करणार शुल्क

OBC Leader Laxman Hake | उपोषणासाठी अंतरवाली सराटीत निघालेल्या ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बार्शी पोलिसांनी घेतले ताब्यात