Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या गटात नाराजी? गडचिरोली, परभणीपाठोपाठ नाशिक गेले, सातारा गेले हाती आल्या 4 जागा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar NCP | महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपात भाजपाने (BJP) अजित पवार गट आणि शिंदे गटाची (Shivsena Eknath Shinde) अतिशय कमी जागांवर बोळवण केली आहे. यामध्ये अजित पवारांच्या गटाची आवस्था तर आणखी बिकट आहे. मिळालेल्या चार जागांपैकी दोन जागांवर भाजपा आणि शिंदे गटाच्या नेत्यांना उमेदवारी द्यावी लागली आहे. सातारा (Satara Lok Sabha) आणि नाशिकसारख्या (Nashik Lok Sabha) हक्काच्या जागा हातातून सुटल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादीत अजित पवारांविरोधात नाराजीचा सूर उमटू लागल्याचे वृत्त आहे. (Ajit Pawar NCP)

अजित पवार भाजपाच्या दबावाला बळी पडत आहेत. तसेच अजित पवार, तटकरे आणि पटेल हे तिघेच निर्णय घेतात, कोणाला विचारात घेत नाहीत, असा सूर पक्षातील काही जणांमध्ये आहे, याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

खरे तर ही लोकसभा निवडणूक अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे. खासदार कमी झाल्याने या नेत्यांची ताकद आपोआपच कमी होईल. विधानसभेच्या जागावाटपात सुद्धा असेच होणार की काय असे आता पवार, शिंदे गटातील नेत्यांना वाटू लागले आहे.

तर दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी (Sharad Pawar NCP) लोकसभेच्या तब्बल १० जागा लढवत आहे. त्यामुळे एकुण जागा लढवण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटापेक्षा सरस ठरली आहे.

आपल्याकडील विद्यमान खासदारांना देखील उमेदवारी मिळवून देताना या नेत्यांच्या नाकीनऊ आल्याचे दिसून येत आहे. त्यातच ओपिनिअन पोलनुसार अजित पवार गटाला बारामतीच्या जागेसह चारही जागा जिंकण्याची शक्यता नाही. आता नाशिक आणि साताऱ्याची जागासुद्धा हातातून निसटल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता असल्याचे वृत्त आहे.

सातारा ही तर राष्ट्रवादी काँग्रेसची हक्काची जागा होती. येथे विद्यमान खासदार राष्ट्रवादीचा आहे.
असे असतानाही साताऱ्याची जागा भाजपाचे उदयनराजे भोसले यांना सोडावी लागली आहे.
तसेच गडचिरोली, परभणी सारख्या जागा अजित पवारांनी महायुतीच्या
दबावाला बळी पडून सोडल्याने नाराजी आहे. नाशिकमध्येही अजित पवार
कमी पडल्याची भावना पक्षात आहे.

तसेच शिंदे गटातही नाराजी असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाचे मंत्री सावंत यांनी काल अजित पवारांसमोरच
व्यासपीठावरच इशारा दिला की, एकेक जागा कमी होऊ लागल्या तर शांत बसणार नाही.

सध्यातरी अजित पवारांची राष्ट्रवादी चारच जागांवर लढत असून या चारमध्ये सुद्धा दोन घरचे
आणि दोन बाहेरचे असा प्रकार आहे. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार यांनी
स्थानिक नेत्याप्रमाणे स्वताला बारामतीमध्ये गुंतवून ठेवले आहे.
आता तर बारामतीच्या जागोवरच अजित पवारांचे अस्तित्व ठरणार की काय,
अशीही चर्चा आहे. येत्या ४ जूनला निकाल लागल्यानंतर सर्व चित्र समोर येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Personnel Died In Accident | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांचा मृत्यू

Amol Kolhe | मी, माझं, माझ्यासाठी हा वैयक्तिक अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन मी निवडणूक लढवत नाही – डॉ. अमोल कोल्हे

Pune Crime Court | पुणे : पतीच्या खुनाच्या गुन्ह्यातील महिला आरोपीची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

Baramati Lok Sabha Election 2024 | अजितदादांचा डमी अर्ज नामंजूर, बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजयी अशीच लढत