Ajit Pawar | शिंदे सरकार लोकशाहीच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं, अजित पवारांचा हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Shiv Sena MLA Santosh Bangar) यांनी एका सरकारी कर्मचाऱ्याला कानशिलात लगावल्याची घटना ताजी आहे. यावर अजित पवारांनी राज्य सरकारवर (State Government) टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) सत्तेतील काही आमदारांची आणि हिंसक वर्तवणुकीचं समर्थन करतात का ? असा सवाल त्यांनी केला. तसेच सत्ता आली म्हणजे मस्ती आली आहे का ? कायदा हातात घेतला जातोय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना हे पटतंय का ? असा सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.

 

अजित पवार Ajit Pawar) पुढे म्हणाले, हे सरकार अजून येऊन काही दिवस झाले आहेत, असं असताना त्यांच्यातले काही आमदार हे अक्षरश: महाराष्ट्रात संघर्ष पेटवा आशाप्रकारची भाषा वापरत आहेत. शिवसैनिकांना ठोकून काढा. शिवसैनिकांचे हात तोडा, तंगडी तोडा, आरेला कारे म्हणा, कोथळा काढा. अरे काय ही पद्धत ? कुठे शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र कुठे आपले पहिले मुख्यमंत्री ज्यांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला, ज्यांनी नेहमी काम करताना कश्या पद्धतीने राजकारण केलं पाहिजे, संस्कार कशा पद्धतीने झाले पाहिजेत, असं शिकवलं त्याच यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या महाराष्ट्रामध्ये तोडा – फोडा – मारा ही पद्धत वापरली जातेय. हे भाजपला (BJP) पटतंय का ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 

अजून तर कुठे सुरुवात झालेली नाहीय आणि…

एका बहाद्दर शिंदे गटाच्या (Shinde Group) आमदाराने सरकारच्या कर्मचाऱ्याला मारहाण (Beating) केली. म्हणजे तुम्ही कायदा हातात घ्यायला लागले. म्हणजे तुम्ही काय समजता, सरकार आलं म्हणजे मस्ती आली का तुम्हाला ? शेवटी कुणीही व्यक्ती असली तरी सर्वांना संविधान, कायदा, नियम सारखे. त्यापेक्षा कुणीही मोठा नाही. या पद्धतीची भाषा ? अजून तर कुठे सुरुवात झालेली नाहीय आणि त्यांना एवढी मस्ती आलेली आहे. त्यांना थांबवलं कसं जात नाही ? त्यांना दोन गोष्टी सांगून थांबवण्याचं काम नाही का ? महाराष्ट्र हा उघड्या डोळ्यांनी सारं पाहतोय ? असं अजित पवार म्हणाले.

 

शिंदे सरकार लोकशाहीच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं

हे शिंदे सरकार (Shinde Government) लोकशाही आणि संसदीय परंपरांच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेलं हे सरकार अद्याप विधी मान्य नाही. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याबाबत तारखा सुरु आहेत. निवडणूक आयोगात प्रकरण सुरु आहे. सुप्रीम कोर्टात याचा निवाडा झाला नाही, असं अजित पवार म्हणाले. अधिवेशनाचा कालावधी खूप कमी आहे. आम्ही त्यांना 17 ते 27 तारखेदरम्यान अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. पुढील वेळी विचार करु असंही ते म्हणाले.

 

चहापानावर बहिष्कार

अजित पवार यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते या भूमिकेतून आज विरोधकांची बाजू पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर टीका केली. तसेच, त्यांच्या कार्यपद्धतीचा समाचार घेताना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित शासकीय चहापानावर विरोधक बहिष्कार टाकत असल्याचे अजित पवारांनी जाहिर केले.

 

Web Title : –  Ajit Pawar | ncp leader ajit pawar angry on eknath shinde group mlas language and bjp

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा