Ajit Pawar | ‘… तर होऊ द्या दूध का दूध, पानी का पानी’, अजित पवारांचे सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn project) महाराष्ट्राच्या हातातून निसटल्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. महाराष्ट्र येणारा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील लाखो तरुणांचा रोजगार (JOB) बुडाल्याची टीका राज्य सरकारवर होत आहे. प्रकल्प गुजरातला जाण्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना जबाबदार धरत आहेत. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात कंपनीकडे करण्यात आलेल्या मागण्यांमुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. याबाबत आता तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच होऊन जाऊ द्या दूध का दूध, पानी का पानी असे म्हणत सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान अजित पवारांनी (Ajit Pawar) दिलं आहे.
चौकशी करायची तर जरुर करा
वेदांतासारखा प्रकल्पातून राज्यात गुंतवणूक येत असताना राष्ट्रवादी (NCP) चांगल्या कामाला नक्कीच पाठिंबा देईल. परंतु यातून पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये. काही पक्षातील लोक, आमच्यापैकी कोणी वेगळ्या मागण्या केल्या होत्या म्हणून प्रकल्प गेला, असे आरोप करत आहेत. मी उपमुख्यमंत्री असताना असं अजिबात झालेले नाही. कारण नसताना संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जातो आहे. जर कुणाला वाटत असेल तर केंद्र सरकार (Central Government), राज्य सरकार (State Government), एजन्सी (Agencies) तुमच्या हातात आहेत. चौकशी करावी पण विधाने करुन बेरोजगारांमध्ये गैरसमज निर्माण करु नये. वास्तविक असं काही घडलेले नाही तरी पण चौकशी करायची तर जुरुर करा. आताच ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊद्या, असे थेट आव्हान अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) दिले.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावर अनेकदा चर्चा झाली आहे. या प्रकल्पातून राज्यातील तरुण बेरोजगांरामध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वस्व पणाला लावून तो प्रकल्प पुन्हा राज्यात आणावा. @AjitPawarSpeaks #NCP pic.twitter.com/aeWxpA1zCl
— NCP (@NCPspeaks) September 20, 2022
एकनाथ शिंदेंनी सर्वस्व पणाला लावावे
वेदांताचा जो प्रकल्प होता, त्याबद्दल चर्चा बरीच झाली. आता मुख्यमंत्री दिल्लीत जाणार आहेत. त्यांनी याचा पाठपुरावा करावा तो त्यांचा अधिकार आहे. बेरोजगारांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सर्वस्व पणाला लावावे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे राज्यात मोठमोठे प्रकल्प यावेत असा आमचा प्रयत्न सुरु होता. काही जण अफवा पसरवत आहेत. चुकीच्या बातम्या देण्याचा प्रयत्न करत आहेत की, वेदांताला नाकारलं हे साफ खोटं आहे. जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) माध्यमांशी बोलत होते.
पुढे ते म्हणाले, या प्रकल्पाबद्दल ज्यांना वास्तविक माहिती नाही. त्यांनी महाविकास आघाडी सरकारबद्दल जनतेत संभ्रमावस्था निर्माण करण्याचे काम केले आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारने राज्यात मोठमोठे प्रकल्प यावे यासाठी प्रयत्न केले. काहीजण उगाच बेरोजगार तरुणांमध्ये अफवा पसरवत आहेत.
— NCP (@NCPspeaks) September 20, 2022
मी पुन्हा महाराष्ट्राला सांगतो…
काहीजण बोत आहेत की, अजून प्रकल्प आणणार आहे. मी पुन्हा महाराष्ट्राला सांगतो महाराष्ट्राच्या हिताचे जे-जे प्रकल्प असतील ते-ते प्रकल्प महाराष्ट्रामध्ये यावेत.
फक्त त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये ही बाब सरकारने लक्षात ठेवावी आणि त्याची नोंद घेतली पाहिजे,
असे स्पष्टीकरणही अजित पवारांनी दिले.
Web Title :- Ajit Pawar | NCP leader ajit pawar challenges eknath shinde devendra fadnavis govt over vedanta foxconn deal allegations
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune-Purandar Airport | पुरंदर विमानतळाचे भूसंपादन एमआयडीसी कायद्यानुसार (MIDC Act)
Male Fertility | ‘हे’ 4 फूड्स खाल्ल्याने वाढेल Sperm Count, पूर्ण होईल पिता बनण्याची इच्छा