Ajit Pawar | उद्धव ठाकरेंच्या सभेला तुम्ही गर्दी जमवली का? अजित पवारांचं मिश्किल उत्तर म्हणाले-‘आमचाच माजी आमदार फुटला, आम्ही कशाला…’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नुकतीच रत्नागीरीतील खेड येथे जाहीर सभा झाली. या सभेला हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. ठाकरे यांच्या सभेला जमलेली गर्दी ही राष्ट्रवादीच्या (NCP) मदतीने जमवलेली गर्दी होती अशी खोचक टीका भाजपसह (BJP) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आमदारांनी केली. याच टीकेबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता त्यांनी हसत मिश्किल उत्तर दिलं. अजित पवार (Ajit Pawar) अहमदनगर दौऱ्यावर होते. अवकाळी पावसामुळे (Maharashtra Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, विरोधक म्हणतायेत की उद्धव ठाकरेंच्या सभेला आम्ही गर्दी जमवली. पण आमचाच माजी आमदार संजय कदम (Former MLA Sanjay Kadam) फुटला. त्यानेच उद्धव ठाकरेंच्या सभेत शिवसेनेत प्रवेश केला आणि आम्ही कशाला गर्दी जमवू…? असं म्हणत ते मिश्किलपणे हसले. बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) निर्माण केलेली शिवसेना आणि आयुष्यभर जपलेलं धनुष्यबाण निवडणूक आयोगाने (Election Commission) उद्धव ठाकरेंना न देता एकनाथ शिंदे यांना दिलं. महाराष्ट्राच्या जनतेला हे आवडलेलं नाही. कालची उद्धव ठाकरेंची खेडची सभा आठवा. आता विरोधक म्हणतायेत की त्या सभेला आमची माणसं होती. पण आमचाच माजी आमदार फुटला, आम्ही कशाला गर्दी जमवू…? असं पवार म्हणाले.

यावेळी अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
कापूस, कांदा, सोयाबीन, द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकरी प्रचंड हवालदिल झाला असताना त्याला आधार देणे हे राज्य सरकारचे काम आहे.
या सरकारला काही सांगायला गेलो, तरी राग येतो, अशी टीका त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

 

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar comment on shivsena uddhav thackeray konkan khed ratnagiri sabha rally

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Politics | ‘दादा… पुणेकरांना वाचवा’; काँग्रेस नेत्याकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना पत्र (व्हिडिओ)

Maharashtra Politics | संजय राऊतांना मातोश्रीच्या गुडबुकमध्ये राहायचे आहे, म्हणून ते…, शिंदे गटाचे टिकास्त्र

Aurangabad ACB Trap | दारु विक्रीची परवानगी देण्यासाठी लाचेची मागणी, दोन पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात